वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून पोलिसांना केले हेल्मेटचे वाटप

  • पोलिस मित्र संघटनेचे शहर कार्याध्यक्ष शहाजी भोसले यांचा स्तुत्य उपक्रम

पिंपरी : पोलीस मित्र संघटना पिंपरी चिंचवड शहरचे कार्याध्यक्ष शहाजी अंकुशराव भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून चिंचवड वाहतूक विभाग व हिंजवडी वाहतूक विभाग येथे हेल्मेटचे वितरण करण्यात आले.

त्यावेळी संघटनेचे सचिन काळे, कमलेश पवार, अरविंद वाघ, ओंकार दाते,सुरज कोळी,अजित दुबे, शुभम ससे, शशांक सिरोडे, सचिन ठाकूर, गणेश अरसूळ,पूजा भंडारे, सुनीता दास, दीपाली अरसुळे, दीपक भापकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.