सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत समाजोपयोगी उपक्रम

सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत समाजोपयोगी उपक्रम


काळेवाडी, ता. २६ : ओम साई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त काळेवाडीत विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजन करण्यात आले. त्यामधील आधार कार्ड दुरूस्ती, मतदान स्मार्ट करणे, आधार कार्ड स्मार्ट करणे आदी सेवांचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला. तसेच ज्येष्ठ नागरिक मोफत वाचनालयाचे उद्घाटन, अन्नदान व १८ मिटर डीपी रस्त्यावर यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.

त्यावेळी नगरसेवक कैलास बारणे, स्वीकृत सदस्य देविदास पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष सुखदेव खेडकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष धर्मा पवार, माजी मंडल अध्यक्ष प्रकाश पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष दशरथ वीर, दत्तात्रेय काटे मामा, ज्योतिबा कामगार मित्र मंडळाचे संस्थापक मधुकर पंधेरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सहसचिव सुरेश विटकर, सामाजिक कार्यकर्ते शाहाजी आत्तार, अॅड. बोळे, मिट्टू शेख, अनिल शेठ नाथानी, नबी मुल्ला, प्रकाश अंकुश, अरूण पवार, प्रभाकर गुरव मामा, संतोष मुळीक, सचिन लिमकर, अनंत काका कुलकर्णी, योगेश तोडकर, मल्हारी शेठ तापकीर, चंद्रकांत तापकीर, नवीन तापकीर, भागवत खरात, विक्रम बाळ, आकाश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, ज्येष्ठ नागरिक वाचनालयाची आवश्यकता लक्षात घेता सोमनाथ तापकीर यांनी तापकीर मळा चौकात मोफत वाचनालय सुरू केले आहे. तसेच पंचनाथ चौकात अन्नदान व १८ मिटर डिपी रस्त्यावर वड, पिंपळ, चिंच आदी झाडांचे रोपण करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत, तापकीर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले.

ओम साई ग्रुप, तापकीर नगर व्यंकटेश्वरा मित्र मंडळ व स्पोर्ट क्लब, साई मल्हार सोशल फाउंडेशन, डीएसपी प्रतिष्ठान, रहाटणी संघर्ष मित्र मंडळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.