नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते व राज तापकीर यांच्या सहकार्याने डीपी रस्ता पूर्णत्वास

नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत नखाते व राज तापकीर यांच्या सहकार्याने डीपी रस्ता पूर्णत्वास

रहाटणी : नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते व भाजप युवा मोर्चाचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष राज तापकीर यांच्या सहकार्याने मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित तापकीर मळा चौक ते गोडांबे कॉर्नर चौक १२ मीटर डीपी रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रवास सुखकारक होण्यास मोलाची मदत झाली आहे.

मागील अनेक वर्षांपासून वंचित असलेला या डीपी रस्त्याची नगरसेविका सुनिता तापकीर, नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते व भायुमोचे राज तापकीर यांनी प्राधान्याने निविदा प्रक्रिया करून, प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. डांबरीकरण न करता काँक्रिटीकरण करत प्रशस्त असा रस्ता तयार केला आहे.

या रस्त्यामध्ये फुटपाथ तयार करण्यात आला असून पावसाचे पाणी वाहून नेणारी वाहिनी, ड्रेनेज लाईन तसेच पिण्याची लाईन टाकण्यात आली आहे. तसेच आकर्षक असे पथदिवेही संपुर्ण रस्त्यावर लावण्यात आले आहेत. सुव्यवस्थित झालेल्या या रस्त्यामुळे पादचाऱ्यांसाठी सुरक्षित व वाहनांसाठी विनाअडथळा प्रवास होत आहे.

दरम्यान, काळेवाडी व पिंपरीगाव ते रहाटणी, पिंपळे सौदागर आदी परिसराला जोडणारा हा प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठी रहदारी असते. आता या रस्त्याचे काम पुर्ण झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

“रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मधील प्रमुख रस्त्यांमधील हा एक रस्ता होता. या रस्त्याचे काम पुर्ण करणे गरजेचे होते. कोरोनाच्या काळात कामात व्यत्यय आला होता. मात्र, नियमांचे पालन करून रस्त्याचे काम करून घेतले. नागरिकांना कशा पद्धतीने चांगल्या सुविधा देता येईल, याचाच आमचा नेहमी विचार असते. – राज तापकीर, अध्यक्ष, भाजप युवा मोर्चा, चिंचवड विधानसभा.