रॉयल फाउंडेशनतर्फे काळेवाडीतील परिसराची साफसफाई

रॉयल फाउंडेशनतर्फे काळेवाडीतील परिसराची साफसफाई

काळेवाडी : नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने रॉयल फाउंडेशनच्या वतीने राजवाडे नगर व नढे नगर इंडियन कॉलनीतील परिसरात साफसफाई करण्यात आली. तसेच नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत जनजागृती करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी रॉयरल फाउंडेशनचे आभार मानले.

राजवाडे नगर भागातील आयप्पा मंदिर जवळ मोकळ्या जागेत व नढे नगर, इंडियन कॉलनीतील काही परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसेच अनेक नागरिक आजारी पडले असल्याच्या तक्रारीही रॉयल फाउंडेशनकडे आल्या होत्या. ही बाब लक्षात घेता, रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि रमेश नांगरे आणि त्यांच्या टिमने तातडीने परिसराची साफसफाई केली.

रॉयल फाउंडेशनतर्फे काळेवाडीतील परिसराची साफसफाई

रॉयल फाउंडेशनने काळेवाडीतील विविध सामाजिक समस्या सोडवण्याचा धडाका सुरू केला असून अनेक नागरिक समस्या घेऊन फाउंडेशनच्या कार्यालयात येतात. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे फाउंडेशनचे अध्यक्ष रवि नांगरे यांनी सांगितले.