शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ‘न्याय मशाल’ अभियान सुरू

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे 'न्याय मशाल' अभियान सुरू
  • लोकसभा निवडणूक प्रचारात न्यायपत्राचा काँग्रेसकडून प्रसार

चिंचवड दि. २८ : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी “न्याय मशाल” आणि “न्याय तुतारी” अभियान मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राबवणार असल्याचे कळवले आहे.

या अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाने दिलेल्या न्यायपत्र या जाहीरनाम्याचा प्रसार आणि उमेदवारांचा निवडणूक प्रचार करत दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी फिरत आहेत.

या अंतर्गत काँग्रेस पक्षाने दिलेल्या सामाजिक भागीदारी, युवक, महिला, श्रमिक, शेतकरी या घटकांसाठी कल्याणकारी संकल्प रचताना कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा दोन यात्रा भारत जोडो आणि न्याय यात्रा करत राहुल गांधींनी जनतेची मते लक्षात घेऊन तयार केलेल्या या जाहीरनाम्याचा प्रसार काँग्रेस कार्यकर्ते करत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्याचा संकल्प, गरज, महत्व आणि जबाबदारी लोकांपुढे जाऊन मांडत आहेत.

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे 'न्याय मशाल' अभियान सुरू

आज या अभियानांतर्गत सांगवी परिसरातील स्व.वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्यापासून सुरुवात करण्यात आलेल्या या अभियानाद्वारे सांगवी परिसरात पवार नगर, भाजी मंडई, गजानन महाराज मंदिरा जवळील परिसर आणि शितोळे नगर या भागामध्ये काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या समूहाने नागरिकांशी संवाद साधत, घोषणा देत, पत्रके देऊन काँग्रेस जाहीरनामा समजून सांगत महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघिरे यांच्या मशाल चिन्हाचा प्रचार केला.

याप्रसंगी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद व नागरिकांकडून महाविकास आघाडीला मतदान देण्याबाबत अनेकांनी सकारात्मक मते व्यक्त केली. या प्रचार अभियानादरम्यान मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या पत्नी सौ उषा वाघेरे यादेखील काही वेळ सहभागी झाल्या.

याप्रसंगी शहर काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेसचे अध्यक्ष सायली नढे, एन एस यु आय चे महाराष्ट्र उपाध्यक्ष एडवोकेट उमेश खंदारे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले, काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष प्रा. किरण खाजेकर, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहीतुले,मावळ लोकसभा युवक काँग्रेस प्रभारी अनिकेत नवले, डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ.मनीषा गरुड, जितेंद्र छाबडा, विजय इंगळे, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे अध्यक्ष विशाल सरोदे, कार्याध्यक्ष सुप्रिया पोहरे, महिला काँग्रेसच्या आशा भोसले, युवक काँग्रेसचे शहर सरचिटणीस सौरभ शिंदे, प्रोफेशनल काँग्रेसचे अध्यक्ष दहाड मुजावर, स्वप्नील नवले, सोशल मिडियाचे जय ठोमरे, कुंदन कसबे, वीरेंद्र गायकवाड, मिलिंद फडतरे, संदेश कुमार नवले, आबा खराडे, किरण नढे, रियाज शेख आदी पदाधिकारी उपस्थित होते.