Tag: Maval

मावळ तालुक्यातील महिलांच्या समस्यांबाबत भाजप महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन
पुणे

मावळ तालुक्यातील महिलांच्या समस्यांबाबत भाजप महिला आघाडीचे तहसीलदारांना निवेदन

मावळ तालुका भाजप महिला आघाडीचे तहसिलदारांना निवेदन वडगाव मावळ, दि.१७ (लोकमराठी) - महिलांच्या समस्यांबाबत मावळतालुका भाजप महिला आघाडीच्या वतिने तहसिलदारांना निवेदन देऊन तालुक्यातील अनेक महिलांना रेशनिंग मिळत नाही, अनेक दिवसांपासून संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन अनेक पेन्शन धारकांची थांबली आहे तरी ती त्वरित चालू करावी.काही शासकीय अडचणी असतील तर त्या पूर्ण करून निराधार तसेच विधवा महिलांना न्याय मिळवून द्यावा. अशी मागणी केली. मावळ तालुका भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांनी मावळचे नवनिर्वाचित तहसीलदार विक्रम देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले; मावळ तालुक्यातील अनेक महिलांना रेशनिंग मिळत नाही. अनेक वेळा पुरवठा अधिकाऱ्याशी संपर्क केला असता उडवा उडवीची उत्तरे महिलांना मिळत असतात. अनेकदा पुरवठा अधिकाऱ्याच्या कार्यालयाशी संपर्क केला असता अधिकारी ऑफिसमध...
MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण
शैक्षणिक

MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण

पुणे : मावळ तालुक्यातील सहा केंद्रातील ५९ शिक्षकांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद या संस्थेमार्फत चालवित असलेल्या स्पोकन इंग्लिश संदर्भात असलेल्या MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण केला. या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती वडगाव मावळ या ठिकाणी घेण्यात आला. याप्रसंगी या प्रमाणपत्राचे वितरण पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम बापू कदम, तालुक्याचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी सुदाम वाळुंज आणि कांचन धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता सुवर्णा तोरणे तसेच विषय तज्ञ सचिन ढोबळे हे उपस्थित होते. या कोर्समध्ये शिक्षक...
थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा
पिंपरी चिंचवड, राजकारण

थेरगावमधील बारणे परिवाराचा पार्थ पवारांना पाठिंबा

पिंपरी चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांना थेरगाव मधील बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला आहे. पार्थ पवार हे आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आहेत. यावेळी पार्थ पवार हे थेरगाव येथे प्रचारासाठी गेले असताना त्यांना बारणे कुटुंबीयांनी पाठिंबा दिला. थेरगाव मधील निलेश बारणे, प्रशांत बारणे, काळूराम बारणे, संभाजी बारणे, जयसिंग बारणे, शंकर बारणे यांच्यासह संपूर्ण थेरगाव मधील बारणे परिवाराने पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. यावेळी बोलताना संभाजी बारणे म्हणाले की, मागील पाच वर्षात श्रीरंग बारणे यांनी कोणत्याही प्रकारची कामे या भागात केली नाही. खासदार म्हणून कोणताही निधी थेरगाव भागाला देण्यात आला नाही. थेरगाव मध्ये अनेक प्रश्न आहेत मात्र कोणतेच प्रश्न सोडविण्यासाठी त्य...