MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण

MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरण

पुणे : मावळ तालुक्यातील सहा केंद्रातील ५९ शिक्षकांनी प्रादेशिक विद्या प्राधिकरण औरंगाबाद या संस्थेमार्फत चालवित असलेल्या स्पोकन इंग्लिश संदर्भात असलेल्या MOOC ऑनलाईन कोर्स पूर्ण केला. या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रम शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती वडगाव मावळ या ठिकाणी घेण्यात आला.

याप्रसंगी या प्रमाणपत्राचे वितरण पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्तात्रेय शेवाळे, माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम बापू कदम, तालुक्याचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे त्याचप्रमाणे विस्ताराधिकारी सुदाम वाळुंज आणि कांचन धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिव्याख्याता सुवर्णा तोरणे तसेच विषय तज्ञ सचिन ढोबळे हे उपस्थित होते. या कोर्समध्ये शिक्षकांनी विशेष प्रावीण्य दाखवून गोल्डन बँड सिल्वर बंड अशी प्रमाणपत्र मिळवली आहे. सदर मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग शिक्षकांनी आपापल्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी करावा स्पोकन इंग्रजी संदर्भात विशेष काम करावे. अशी आशा माननीय गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी बोलून दाखवली.

इंग्रजी जागतिक भाषा असून ती आपल्याला चांगल्या पद्धतीने आली पाहिजे या कोर्स द्वारे शिक्षकांनी ती आत्मसात करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अशी भावना माननीय सभापती ज्योती ताई शिंदे यांनी बोलून दाखवली.

माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम बापू कदम यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन नियोजन पंचायत समिती विषय तज्ञ सुचिता भोई यांनी केले.

या कोर्ससाठी मावळ तालुक्यातून मल्लिकार्जुन कांबळे यांनी राज्यस्तरीय मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती ज्योती शिंदे होत्या. कार्यक्रमासाठी कोर्स पूर्ण केलेले सर्व शिक्षक व तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लिकार्जुन कांबळे यांनी केले पाहुण्यांचे स्वागत रूपाली पटेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या नवथळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सुचिता इंगळे यांनी मानले.