राजकारण

राजकारण Politics News Mrathi – LokMarathi News

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ‘न्याय मशाल’ अभियान सुरू
राजकारण

शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे ‘न्याय मशाल’ अभियान सुरू

लोकसभा निवडणूक प्रचारात न्यायपत्राचा काँग्रेसकडून प्रसार चिंचवड दि. २८ : मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या अनुषंगाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी "न्याय मशाल" आणि "न्याय तुतारी" अभियान मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात राबवणार असल्याचे कळवले आहे. या अभियानांतर्गत काँग्रेस पक्षाने दिलेल्या न्यायपत्र या जाहीरनाम्याचा प्रसार आणि उमेदवारांचा निवडणूक प्रचार करत दोन्ही लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी फिरत आहेत. या अंतर्गत काँग्रेस पक्षाने दिलेल्या सामाजिक भागीदारी, युवक, महिला, श्रमिक, शेतकरी या घटकांसाठी कल्याणकारी संकल्प रचताना कन्याकुमारी ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा दोन यात्रा भारत जोडो आणि न्याय यात्रा करत राहुल गांधींनी जनतेची मते ल...
PCMC : राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
पिंपरी चिंचवड, राजकारण

PCMC : राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्विय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांची भेट घेतली आणि शहरातील विविध प्रभागातील प्रलंबित कामे आणि समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली. शहराच्या विविध प्रभागातील विकास कामे आणि प्रलंबित प्रश्न तसेच प्रभागातील इतर समस्या युवक पदाधिकाऱ्यांनी आयुक्तासमोर मांडल्या. विशाल वाकडकर यांनी त्यांच्या वाकड, ताथवडे पूनावळे भागातील दिवसेंदिवस होत असलेली वाहतुकीची गंभीर समस्या त्याचबरोबर खड्डेमय रस्ते, मुंबई बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात वारंवार साचनारे पाणी याबाबत सविस्तर विचारणा केली. विशाल काळभोर यांनी त्यांच्या चिंचवड प्रभागातील रस्ते, उद्यान, स्वच्छ्ता, विद्युत या विभागातील काही समस्...
PIMPRI CHINCHWAD : शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार!
राजकारण

PIMPRI CHINCHWAD : शहरातील लाभार्थी होणार ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार!

भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा नियोजनात पुढाकार ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातील 3 हजार नागरिकांची उपस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो टप्पा दोन, 'वेस्ट टू एनर्जी’, आणि आवास योजनेच्या लोकार्पण व भूमिपूजन पिंपरी, 31 जुलै : राज्यातील पहिला ‘वेस्ट टू एनर्जी’ म्हणजेच कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प , सर्वांसाठी घर या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजनेतून पिंपरी-चिंचवडमध्ये तब्बल १७ हजार घरांची निर्मिती होत आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण व भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि. १ ऑगस्ट रोजी शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला पिंपरी चिंचवड शहरातून 3 हजार नागरिक तसेच लाभार्थी हजेरी लावणार आहेत. अशी माहिती भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली...
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती 
पिंपरी चिंचवड, राजकारण

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त | शहराध्यक्ष इम्रान शेख यांची माहिती

पुरोगामी विचाराने समृद्ध युवकांची नव्याने नेमणूक करणार - इम्रान शेख कष्टकरी कामगार वंचित दुर्लक्षित घटक यांच्या मुलांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार पिंपरी, ता. २९ जुलै (लोकमराठी न्यूज) : " शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांच्या राजकीय व सामाजिक राजकीय चळवळीची गरज निर्माण झाली आहे. म्हणुन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची विद्यमान शहर कार्यकारणी आम्ही बरखास्त करत आहोत. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेनुसार काम करणाऱ्या वरील पदांवरील पदाधिकाऱ्यांना अधिवेशन काळ संपल्यानंतर प्रांताध्यक्ष जयंत पाटील युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, खासदार अमोलजी कोल्हे, आमदार रोहित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी युवकची नवीन कार्यकारणी स्थापन करून लवकरच नवीन जबाबदाऱ्या ...
बेंगलोरमधील भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा सहभाग
राजकारण

बेंगलोरमधील भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा सहभाग

भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनजागृती करण्याचा केला निर्धार लोकमराठी न्यूज : बेंगलोर येथे भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ' बेहतर भारत कि बुनियाद ' या तीन दिवसीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसने आपला सहभाग नोंदविला. या अधिवेशनात भारतातल्या सुमारे ३००० युवकांनी भाग घेतला. भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात सामान्य माणसात जनजागृती करणे, बेरोजगार आणि महागाई विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणे आणि भाजपच्या खोट्या प्रचाराविरोधात लढा देणे या त्रिसूत्रीवर भर देण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला. मणिपूर येथील झालेल्या घटनांचा अधिवेशनात तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला असून भारतीय युवक काँग्रेस शोषित, पीडित महिलांच्या मागे ठाम पाने उभे असल्याची ग्वाही या अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आली. भारत जोडो यात्रा हि आयडिया ऑफ इंडियाच्या रक्षणासाठी काढण्यात आ...
किरीट सोमय्यांच्या जागी इतर पक्षाचा नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता – सायली नढे 
पिंपरी चिंचवड, राजकारण

किरीट सोमय्यांच्या जागी इतर पक्षाचा नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता – सायली नढे

पिंपरी चिंचवड शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने सोमय्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन पिंपरी (लोकमराठी न्यूज) : किरीट सोमय्या यांच्या जागी इतर पक्षाचा कोणता नेता असता तर आतापर्यंत तो जेलमध्ये असता. सोमय्या हे भाजपचे नेते असल्यामुळे त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई झाली नाही. त्यामुळे आज आम्ही किरीट सोमय्या यांचा जोडे मारून निषेध करतो. असे म्हणत काँग्रेस पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षा सायली किरण नढे यांनी भाजप सरकारवर टिकास्त्र सोडले. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा नेटा डिसूजा, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे व शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम अध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाने महिला अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये झालेल्या अमानवी महिला अत्याचाराच्या व किरीट ...
पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी-चिंचवडमध्ये शत-प्रतिशत भाजप करण्यासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करणार – भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप

पिंपरी : आगामी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टीला शत-प्रतिशत समर्थन मिळवून देण्यासाठी पक्षाचे शहरातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नवनियुक्त शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शंकर जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रमविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, आमदार उमा खापरे व राज्यातील पक्षाच्या इतर नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या सर्व निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्याबरोबरच शहरात पक्...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध – वेदांग महाजन
राजकारण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बेताल वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध – वेदांग महाजन

पुणे (लोकमराठी न्यूज) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर बेताल वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंग आहे. अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. असे प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी यापुढे अशी बेताल वक्तव्य केल्यास मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हालगी आंदोलन कलाकारांना सोबत घेऊन केले जाईल. असा इशारा इशाराही वेदांग महाजन यांनी दिला‌ आहे. ...
‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण
पिंपरी चिंचवड, राजकारण

‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण

चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे यांचा उपक्रम देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधान मोदींचा व्हर्च्युअल संवाद पिंपरी (दि. २७) : केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज मंगळवारी (दि. २७) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेरा बूथ, सबसे मजबूत' मोदी @ ९ या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संघटनात्मक मंडळे आणि बूथवर देशभरातील सुमारे दहा लाख भाजप कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधत त्यांना संबोधित केले. भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शहर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्य...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त 
राजकारण, मोठी बातमी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झा...