पुणे (लोकमराठी न्यूज) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथील मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर बेताल वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस हे नागपूरला लागलेला कलंग आहे. अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. असे प्रदेश संघटक वेदांग महाजन यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी यापुढे अशी बेताल वक्तव्य केल्यास मुंबईतील त्यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हालगी आंदोलन कलाकारांना सोबत घेऊन केले जाईल. असा इशारा इशाराही वेदांग महाजन यांनी दिला आहे.