शिवजयंतीनिमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबची अतिशय दुर्गम भागातील भैरवगड व घनचक्कर गडावर यशस्वी चढाई
पिंपरी चिंचवड : शिवजयंती निमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा 119 वा ट्रेक दिनांक 15 व 16 मार्च 2025 रोजी अतिशय दुर्गम भागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यातील, शिरपुंजे गावामध्ये भैरवगड व घनचक्कर असे दोन गड येथे आयोजित केले होते. या ट्रेकमध्ये सर्वात लहान तीन वर्षाच्या आयुष रहाणे तसेच अनन्या बालघरे, राही जाधव, चिरायू बर्गे या बाल वीराने भाग घेतला होता. त्याचबरोबर भगवान खेडेकर वय 75 या ज्येष्ठ नागरिकांनी सह 85 सदस्यांनी भाग घेतला होता.
सकाळी पावणे साडेसहाला वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली. सर्वात प्रथम फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांनी सर्वांचे स्वागत करून सर्व सुरक्षिततेच्या नियम यासंबंधी सर्व सूचना दिल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा शिरपुंजे गावापासून ट्रेकिंगला सुरुवात झाली. घनचक्कर आणि भैरवगड यांच्यामधील घळीतून किल्ल्यावर जाणारी...