महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
लोकमराठी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ व हिरकणी महिला संघाने आयोजित केलेला २८ वा वर्धापन दिन, स्नेहमेळावा व महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ समाज बांधवांच्या भव्यदिव्य उपस्थितीत पार पडला. दिघी येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती समाजसेवा संघाचे मुख्य प्रवर्तक सुभाष पवार, अनिल मोरे, सुनील साळुंखे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन, गणेशपूजन करण्यात आले. यावेळी संघाचे जेष्ठ मार्गदर्शक शिवाजी सोनाटे, शांताराम बापू पवार, रमेश साळुंखे, रमेश सपकाळ, सहदेव भोसले, शिवाजी निकम, मधुकर पार्टे, माजी अध्यक्ष संतोष चिकणे व सर्व विभागीय सदस्य, आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडच्या विकासासाठी व प्रदूषण टाळण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून निगडी येथील भक्ती-शक्ती येथे स्वच्छता मोहीम, वृ...