ताज्या घडामोडी

तुम्ही डोकं आपटून घ्याल, अशा पद्धतीने दिनेश कार्तिक धावबाद झाला
क्रीडा, ताज्या घडामोडी

तुम्ही डोकं आपटून घ्याल, अशा पद्धतीने दिनेश कार्तिक धावबाद झाला

दिनेश कार्तिक IPL 2023 मध्ये वाईट टप्प्यातून जात आहे. गेल्या मोसमात स्टार असलेल्या डीकेला यावेळी धावा करता आल्या नाहीत. शिवाय, तो यावर्षी विकेटकीपिंगमध्येही चुका करत आहे. आणि त्याची रनिंग बिटवीन द विकेट हा देखील यावेळी चर्चेचा विषय आहे. कार्तिक यावेळीही रनआउट झाल्यामुळे चर्चेत आला आहे. पण लखनौ विरुद्ध, सोमवार 1 मे रोजी त्यांचीही फसवणूक झाली. लखनौविरुद्ध बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आणि सुरुवातीला हा निर्णय योग्य वाटला. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने पॉवरप्लेमध्ये कोणतेही नुकसान न करता बाहेर काढले. मात्र यादरम्यान त्याचा वेग खूपच कमी होता. धावणे खूप हळू असावे.आणि त्यानंतर कोहलीची विकेट पडल्यानंतर सतत हादरे बसत होते. 18 वे षटक संपले तेव्हा परिस्थिती अशी होती की संघाने 6 गडी गमावून 115 धावा केल्या होत्या. वानिंदू हसरंगा आणि दिनेश कार्तिक क्रीजवर होते...
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने पोलिस पाटिल सन्मान
ताज्या घडामोडी

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने पोलिस पाटिल सन्मान

लोणावळा, दि.९ (लोकमराठी) - लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने पोलिस पाटिल यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा एक महत्त्वाचा कणा आहे. प्रामुख्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील करीत असतो. गाव पातळीवर कोणतेही काम असू दे सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पोलीस पाटील असतो. म्हणून अशा पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी (आयपीएस) सत्य साई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संजय जाधव,पोलीस पाटील शहाजहान इनामदार,पोलीस पाटिल ह.भ.प अनंता शिंदे, पोलीस पाटिल अनिल पडवळ, पोलीस पाटिल राहुल आंबेकर, पोलीस पाटील गुरुनाथ मांडेकर, पोल...
पिंपळे सौदागरमधील लिनियर गार्डन बनले दारूड्यांचा अड्डा
पिंपरी चिंचवड, ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागरमधील लिनियर गार्डन बनले दारूड्यांचा अड्डा

पिंपरी : पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील महानगरपालिकेचे प्रसिद्ध लिनियर गार्डन (Linear Garden) दारूड्यांचा अड्डा बनले असून दिवसाढवळ्या तळीराम येथे पार्टी करताना दिसतात. त्याचा नागरिकांना त्रास होत असल्याने पोलीस प्रशासनाने या दारूड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) वतीने हे प्रशस्त व सुंदर गार्डन विकासीत करण्यात आले आहे. या गार्डनमध्ये महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक येतात. मात्र, दारूड्यांचा येथे वावर वाढला असून दिवसाढवळ्या ते गार्डनमध्ये दारू पिताना दिसतात. दरम्यान, अशा प्रकारचे किळसवाणी दृश्ये पाहून गार्डन मध्ये येणाऱ्या मुलांच्या बाल मनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणे कायद्याने गुन्हा असून पोलीस प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी परिसरातील नाग...
मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिकेत ACB ची धाड
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मोठी बातमी : पिंपरी चिंचवड महापालिकेत ACB ची धाड

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकला असून सव्हेंअर संदीप लबडे यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले असल्याची माहिती समजली आहे. सविस्तर वृत्त लवकरच.. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); https://twitter.com/news_lokmarathi/status/1554764231207436288?t=3VaR78Eoo_jTsdoU6R-0aQ&s=19
एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री; तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

मुंबई, ३० : महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज पद व गोपनीयतेची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राजभवनच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी श्री. शिंदे आणि श्री. फडणवीस यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रगीतानंतर श्री. शिंदे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा उल्लेख करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्यास केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांच्यासह सर्वश्री प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, प्...
नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

नायब तहसीलदार पदी निवड झालेल्या थेरगाव कन्या तमन्ना शेख यांचा सन्मान

पिंपरी : थेरगावच्या तमन्ना शेख हिची नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एजुकेशन फाउंडेशनच्या वतीने सन्मान करण्यात आला. २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तमन्ना शेख हिने उत्कृष्ट यश मिळवले. त्यामुळे तीची नायब तहसीलदार पदी निवड झाली. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख, इकबाल शेख यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन तमन्ना हिला सन्मानित करण्यात आले. घरची परिस्थिती बिकट, आई शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावते, वडील फोर्स मोटर्स कंपनीत कामगार आहेत. थेरगाव येथील आनंदवन सोसायटीत राहणारे शेख कुटुंबातील तमन्ना हिने कुठलाही क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयॊगाची परीक्षा दिली व तिसऱ्या प्रयत्नामध्ये मुलींमध्ये राज्यात ८ वी, सर्वसाधारण गटात १०६ वी येऊन नायब तहसीलदार पदी निवड झाली....
आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भावना” लघुपटातील कलाकारांचा सन्मान!
ताज्या घडामोडी, मनोरंजन

आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भावना” लघुपटातील कलाकारांचा सन्मान!

पिंपरी चिंचवड : वर्किंग वूमन वर आधारित असलेला व महिला सशक्तिकरणाचा सामाजिक संदेश देणारा बहुचर्चित "भावना" लघुपटाला नुकताच रॉयल सोसायटी ऑफ टेलिव्हिजन व मोशन पिक्चर्स आवार्ड या आंतरराष्ट्रीय संस्थे तर्फे "बेस्ट वूमन शॉर्ट फिल्म" म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच गोल्डन ईगल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये देखील "बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म" म्हणून "भावना" लघुपटाला गौरविण्यात आले आहे. सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पिंपरी-चिंचवड शहरातील हा एकमेव लघुपट ठरला आहे. याचीच दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात "भावना" लघुपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांच्या सह लघुपटातील सर्वच कलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष दत्ता ...
मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील
ताज्या घडामोडी

मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

मुंबईत होऊ घातलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला कोणताही धोका नाही, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली. सदस्य अमित साटम यांनी नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना याबाबत वक्तव्य केले होते. यावर गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. आयपीएलच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियम आणि ट्रायडेंट हॅाटेलवर दहशतवादी हल्ला करण्याबाबत कोणतीही धमकी मिळाली नाही. खेळाडूंची निवास व्यवस्था असलेल्या हॉटेल्सची दहशतवाद्यांनी रेकी केली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात येत आहेत. या वृत्ताचे खंडण करून अशी कोणतीही धमकी आणि रेकी करण्यात आली नाही, मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनीही केले आहे, असे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले. ...
नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांनी ताबडतोब सोडवावेत : डॉ. कैलास कदम
ताज्या घडामोडी

नागरिकांना भेडसावणारे प्रश्न आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांनी ताबडतोब सोडवावेत : डॉ. कैलास कदम

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून ओळखली जात असतानाही अनेक मुलभूत प्रश्न अद्यापही सुटलेले नाहीत. मागील पाच वर्षात भाजपाच्या सत्तेच्या काळात पाणी, वाहतूक, नदी प्रदूषण, कचरा समस्या, आरोग्य विषयक समस्यांनी तर उग्ररुप धारण केले आहे. या समस्या कायमस्वरुपी सोडविण्यास भाजपाचे मनपातील पदाधिकारी अपयशी ठरले आहेत. १४ मार्च पासून मनपाचे कामकाज प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील पाहणार आहेत. आयुक्त पाटील हे कुशल प्रशासक म्हणून ओळखले जातात. आता त्यांनी प्रशासक पदाच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे आणि कर देणा-या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली आहे.शुक्रवारी डॉ. कैलास कदम यांनी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत आयुक्तांची मनपा भ...
पीसीसीओईआर मध्ये एका दिवसात पंच्याहत्तर पेटंट्स नोंदणीचा विक्रम
ताज्या घडामोडी

पीसीसीओईआर मध्ये एका दिवसात पंच्याहत्तर पेटंट्स नोंदणीचा विक्रम

पिंपरी (दि. १२ मार्च २०२२) देशभर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी आणि संशोधन महाविद्यालय (पीसीसीओईआर) मध्ये २८ फेब्रुवारी २०२२ अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून एका दिवसात ७५ पेटंट्सची नोंदणी करत एक नवीन विक्रम केला आहे.अशी माहिती संस्थेच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य डॉ. हिरीष तिवारी यांच्या समन्वयाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नोंदणी झालेल्या ७५ पेटंटची पुस्तिका करण्यात आली त्याचे प्रकाशन विश्वस्त मंडळाच्या हस्ते शुक्रवारी (दि. ११ मार्च...