उकडीचे मोदक – गणेश चतुर्थी स्पेशल
गणेश चतुर्थीसाठी बाजारात अनेक प्रकारचे मोदक उपलब्ध असले तरी खरा मान असतो तो उकडीच्या मोदकालाच. कोकणाची खासियत असलेले उकडीचे मोदक आता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि जगभरातही लोकप्रिय होत आहेत. खरे तर यात तीनच मुख्य घटक लागतात - तांदळाची पिठी, नारळ आणि गूळ. आणि तूप वापरले नाही तर वेगन डाएट करणाऱ्यांनाही सहज खाता येतील. तर आज करून पाहूया authentic उकडीचे मोदक. खाली विशेष टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे मोदक बनवणे सोपे जाईल.
साहित्य :
सारणासाठी
१ मोठा नारळ, खवणून शक्यतो पांढराशुभ्र भाग घ्यावा.
१ मोठी वाटी गूळ, किसून
अर्धा चमचा वेलचीपूड
कव्हरसाठी
१ ग्लास मोदकाचे पीठ (हे बाजारात सहज मिळते पण घरीही बनवू शकतो, कृती खाली वेगळी दिली आहे.)
२ चमचे साजूक तूप
१ ग्लास पाणी
कुकिंग टिप्स :
कोकणात बरेचदा गोड पदार्थात मीठ घातले जाते. हवे असल्यास उक...