मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे

खासदार बारणे यांच्या मावळ तालुक्यातील प्रचाराचा विजय शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ

मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे

पिंपरी, 29 मार्च – बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले.
शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनराध्यक्ष सुनील शेळके, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, आरपीआयचे पुणे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, भाजपचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, शिवसेना जिल्हाप्रमुख गजाजन चिंचवडे, पिंपरी-चिंचवडचे शहरप्रमुख योगेश बाबर, रवींद्र भेगडे, बाळासाहेब जांभूळकर, शंकरराव शेलार, संतोष दाभाडे, अविनाश बवरे, शांताराम कदम, गुलाब म्हाळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, सभापती सुरेखा कुंभार, नंदाताई सातकर, एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, भारत ठाकूर, चंद्रशेखर भोसले, बाळासाहेब घोटकुले, रामनाथ वारिंगे, माऊली शिंदे आदी उपस्थित होते.