मनोरंजन

शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील 
मनोरंजन

शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या शहराध्यक्षा पदी शैला पाटील

पिंपरी (Lokmarathi News) : शिवसेना (शिंदे गट) चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महिला शहराध्यक्षा पदी शैला चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली. शिवसेना उपनेते व खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. त्यावेळी उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, शहर संघटीका सरिता साने आदी उपस्थित होते. शैला पाटील यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले आहेत. त्यामध्ये प्रेमरंग, बिंडी, सर्जा, तांडव सिरिअल दख्खनचा राजा, ऐकविरा आई, वेबसिरिज प्रेमाच्या पलिकडे या प्रमुख चित्रपट व सिरीयल मध्ये कामे केलेल्या असल्यामुळे शैला पाटील यांची पिंपरी चिंचवड शहराच्या शिवसेना चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेना पक्षाला शैला पाटील यांचा संघटना बांधण्यासाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. ...
Katrina पेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर तू तिला सोडशील का?Vicky Kaushal ने दिले असे उत्तर…
मनोरंजन

Katrina पेक्षा चांगली हिरोईन मिळाली तर तू तिला सोडशील का?Vicky Kaushal ने दिले असे उत्तर…

images instagram/katrinakaif विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि कैटरीना कैफ (Katrina Kaif) हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले जोडपे आहेत. दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवडते. दरम्यान, अभिनेता अलीकडेच त्याच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' (Zara Hatke Zara Bachke) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात सहभागी झाला होता. जिथे त्याने त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलले. पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांना एक विचित्र प्रश्न विचारण्यात आला. विकीची पत्नी कतरिना कैफशी संबंधित असलेल्या या प्रश्नावर तेथे उपस्थित असलेले सर्वजण हसले. मात्र, या प्रश्नाला विकीने ज्या पद्धतीने उत्तर दिलं आहे, ते चाहत्यांना आवडतंय. कतरिना कैफला घटस्फोट देणार विकी कौशल? गोविंदा नाम मेरा फेम अभिनेत्याला विचारण्यात आले की, जर त्याला "चांगली नायिका" मिळाली तर तो कतरिनाला घटस्फोट देण्याचा विचार करेल का? हा अनोखा प्रश्...
…अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू
पिंपरी चिंचवड, मनोरंजन

…अन्यथा झी टॉकिजचे कार्यालय फोडू

हर हर महादेव चित्रपट दाखविण्यावरून संभाजी ब्रिगेडचा इशारा लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी (दि. ४ डिसेंबर २०२२) : झी टॉकिजवर हर हर महादेव (Har Har Mahadev) चित्रपट दाखविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाविरोधात देशात, राज्यात शिवप्रेमींनी तीव्र आंदोलन करत नापसंती व्यक्‍त केली आहे. तरीही झी टॉकिज या चॅनेलने हा चित्रपट दाखविल्यास त्यांच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन छेडू. तरीही न ऐकल्यास कार्यालय फोडू, असा तीव्र इशारा संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांना दिलेल्या निवेदनात हा इशारा दिला आहे. सतिश काळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, हर हर महादेव चित्रपटामध्ये अनेक चुकीचे व वादग्रस्त संदर्भ दाखवित आले आहेत....
पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश 
विशेष लेख, मनोरंजन, मोठी बातमी

पुरुष मर्द आणि स्त्री नाजूक? — जेट जगदीश

'हर हर महादेव' हा (Har Har Mahadev 2022) चित्रपट म्हणजे एकूण सगळा विनोदच आहे. पण ते तसेच सोडून देऊन चालणार नाही. कारण या चित्रपटाचे निर्माते हे हिंदुत्ववादाने भारलेले धर्मांध आहेत आणि नवीन पिढीमध्ये आपल्या सोयीचा इतिहास लिहून चुकीचा संस्कार रुजवण्यात हातभार लावणारे आहेत. त्यामुळे त्यांना योग्य वेळी धडा शिकवलाच पाहिजे. पण या चित्रपटात मांजरेकरचा मुलगा कोवळा दिसतो म्हणून त्याची खिल्ली उडवणे मात्र योग्य नाही. कारण 'पुरुष म्हणजे मर्द' अशी जी एकूण पुरुषाची प्रतिमा तयार केली गेलेली आहे तीच मुळात चुकीची आहे. आज आपण अशा चुकीच्या कल्पनांमुळे कोवळ्या दिसणाऱ्या पुरुषाची खिल्ली उडवतो, हे तर त्याहूनही असंस्कृतपणाचे लक्षण आहे. एकूण जगभर पुरुषसत्ताक अवस्था घट्ट रुजवताना स्त्री आणि पुरुषांना विशिष्ट चौकटीत अडकवले गेले आहे. कारण माणूस जेव्हा शेती करू लागला आणि एका जागी स्थिर झाला तेव्हा स्त्रीला बा...
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच भव्य नऊवारी साडी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन
पिंपरी चिंचवड, मनोरंजन

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये प्रथमच भव्य नऊवारी साडी सौंदर्य स्पर्धेचे आयोजन

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क चिंचवड, ता ७ : पिंपरी-चिंचवड शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये प्रथमच नऊवारी साड्या घालून भव्य फॅशन शोचे आयोजन येथे करण्यात आले आहे. येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन विविध राजकीय मान्यवर व सिने कलाकार यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ९ जुलै) सकाळी अकरा वाजता होणार असून हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहील. तरी शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी या भव्यदिव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे कार्यक्रमाचे आयोजक चैताली भोईर यांनी आवाहन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रीय संस्कृतीला साजेसा असा नऊवारी साज व त्यासोबत पुरूष आयकॉन (ट्रॅडिशनल कपडे) या स्पर्धेत लहान मुलं-मुली देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील नऊवारी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले नऊवारी नार वस्त्र दाल...
कलाकार हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आलेला असतो : प्रवीण तरडे
मनोरंजन

कलाकार हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आलेला असतो : प्रवीण तरडे

महासिनेमा‘'सरसेनापती हंबीरराव'ला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपरी, पुणे, ता. ३० मे २०२२ : कलाकार हा समाजाचं देणं फेडण्यासाठी जन्माला आलेला असतो. त्याने समाजाचं देणं फेडलंच पाहिजे, असे प्रतिपादन "सरसेनापती हंबीरराव" या चित्रपटाचे दिग्दर्शक व मुख्य कलाकार प्रविण तरडे यांनी केले. सोमवारी पिंपरीत पत्रकारांशी संवाद साधताना प्रविण तरडे बोलत होते. यावेळी कलाकार रमेश परदेशी, सुनील अभ्यंकर आदी उपस्थित होते. यावेळी तरडे म्हणाले की, मराठी चित्रपटात यापूर्वी नटाला कधी एन्ट्री अशी मिळालीच नाही. पण हंबीरराव मध्ये एन्ट्रीलाच टाळ्या, शिट्या मिळत आहेत. या चित्रपटाचे वेगळेपण म्हणजे हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणे भव्यता आणि दिव्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसेनापती करण्यासाठी अनेक अभिनेते शोधले, पण प्रत्येकात काहीतरी उणिवा जाणवत होत्या. यानंतर निर्मात्यांनी माझ्या ना...
आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भावना” लघुपटातील कलाकारांचा सन्मान!
ताज्या घडामोडी, मनोरंजन

आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त “भावना” लघुपटातील कलाकारांचा सन्मान!

पिंपरी चिंचवड : वर्किंग वूमन वर आधारित असलेला व महिला सशक्तिकरणाचा सामाजिक संदेश देणारा बहुचर्चित "भावना" लघुपटाला नुकताच रॉयल सोसायटी ऑफ टेलिव्हिजन व मोशन पिक्चर्स आवार्ड या आंतरराष्ट्रीय संस्थे तर्फे "बेस्ट वूमन शॉर्ट फिल्म" म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच गोल्डन ईगल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल मध्ये देखील "बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म" म्हणून "भावना" लघुपटाला गौरविण्यात आले आहे. सलग दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा पिंपरी-चिंचवड शहरातील हा एकमेव लघुपट ठरला आहे. याचीच दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेना पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने नेहरूनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात "भावना" लघुपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांच्या सह लघुपटातील सर्वच कलाकारांचा स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे शहराध्यक्ष दत्ता ...
“भावना” लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
मनोरंजन

“भावना” लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

"भावना" हा लघुपट ९ जानेवारी २०२२ रोजी "रेडबड मोशन पिक्चर्स" या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झाला होता. रेडबड मोशन पिक्चरने हा लघुपट बनवला आहे. याचे लेखन, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले सीए अरविंद भोसले यांनी केले आहे. तर पोस्ट प्रोडक्शन (संपादन) पिंपरी चिंचडमधील एपीएच स्टुडिओच्या डायरेक्टर व अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे. पिंपरी : वर्किंग वूमन’ या विषयावर आधारित असलेल्या बहुचर्चित ‘भावना’ लघुपटला रॉयल सोसायटी ऑफ टेलिव्हिजन व मोशन पिक्चर्स आवार्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने "बेस्ट वूमन शॉर्टफिल्म" म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या लघुपटाला गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देखील "बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म" हा पुरस्कार मिळाला आहे. तर भारताच्या सर्वात मोठ्या असलेल्या सीएसआर या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये देखील "भावना" लघुपटाला नामाकिंत करण्यात आले हो...
पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चिंचवड मध्ये ‘स्वर सुमनांजली’ चे आयोजन
पिंपरी चिंचवड, मनोरंजन

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त चिंचवड मध्ये ‘स्वर सुमनांजली’ चे आयोजन

पिंपरी (दि. ४ एप्रिल २०२२) स्वरभास्कर, भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. यानिमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा आणि कलाश्री संगीत मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरभास्करास ''स्वर यज्ञ'' या एक दिवसीय सांगीतिक महोत्सवातुन '' स्वर सुमनांजली'' अर्पण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य असून याचे उद्‌घाटन शनिवारी (दि. ९ एप्रिल) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह येथे मान्यवरांच्या हस्ते सकाळी ६ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात सलग २४ तास स्थानिक कलाकारांसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचा समारोप रविवारी (दि. १० एप्रिल) सकाळी ६ वाजता होणार आहे अशी माहिती संगीत महोत्सवाचे संयोजक अखिल भारतीय नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचे भाऊसाहेब भोईर आणि कलाश्री संगीत मंड...
उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलाकारांचा सन्मान
पिंपरी चिंचवड, मनोरंजन

उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलाकारांचा सन्मान

पिंपरी (प्रतिनिधी) : कला क्षेत्रातील विविध अभिनय साकारणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील अभिनेता व अभिनेत्रींच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रसिध्द सिने कलाकार उमेश धूत, ईशान गोडसे व सौ वसुधा गोडसे यांचा सन्मान करण्यात आला. उमेश धूत यांनी दिक्षीत, सावट, मुळशी पॅटर्न, देवा, सुर सपाटा इत्यादी मराठी तर ये है मोहब्बते, तेरा क्या होगा कालिया, लक्ष अशा हिंदी चित्रपटांसह प्रेमा तुझा रंग कसा, सुर राहू दे आदी मराठी सिरियल्समध्ये भूमीका साकारली आहे. तसेच, त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रसिध्द केलेल्या जाहिरातींमध्येही त्यांनी काम केले आहे. व ईशान गोडसे यांनी ही सोयरीक या मराठी चित्रपट बरोबरच कॅडबरी चॉकलेट व इतर जाहिरातींमध्ये काम केले आहे. तर वसुधा गोडसे या बऱ्याच चित्रपटा मध्ये काम क...