“भावना” लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

"भावना" लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

“भावना” हा लघुपट ९ जानेवारी २०२२ रोजी “रेडबड मोशन पिक्चर्स” या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित झाला होता. रेडबड मोशन पिक्चरने हा लघुपट बनवला आहे. याचे लेखन, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले सीए अरविंद भोसले यांनी केले आहे. तर पोस्ट प्रोडक्शन (संपादन) पिंपरी चिंचडमधील एपीएच स्टुडिओच्या डायरेक्टर व अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे.

पिंपरी : वर्किंग वूमन’ या विषयावर आधारित असलेल्या बहुचर्चित ‘भावना’ लघुपटला रॉयल सोसायटी ऑफ टेलिव्हिजन व मोशन पिक्चर्स आवार्ड या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने “बेस्ट वूमन शॉर्टफिल्म” म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

"भावना" लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

या लघुपटाला गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये देखील “बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म” हा पुरस्कार मिळाला आहे. तर भारताच्या सर्वात मोठ्या असलेल्या सीएसआर या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये देखील “भावना” लघुपटाला नामाकिंत करण्यात आले होते. या संस्थेच्या वतीने “भावना” लघुपटाचे दिग्दर्शक सीए अरविंद भोसले यांना पद्मविभूषण डॉ कांतीलाल संचेती यांच्या प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले होते.

या शॉर्ट फिल्मच्या केंद्रस्थानी काम करणा-या महिला आहेत. त्यांना रोजच्या दैनंदिन जीवनात येणा-या अडचणी या माध्यमातून सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न सीए अरविंद भोसले यांनी केला आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत महिला काम करतात. किचन, ऑफिस, मुलांचे संगोपन, घरातील जबाबदा-या या प्रत्येक बाबतीत महिलांची भूमिका महत्वाची आहे. महिला सशक्तीकरणाचा एक चांगला सामाजिक संदेश या लघुपटातून मधून देण्यात आला आहे.

या लघुपटाची निर्मिती युवराज तावरे, मनोज गायकवाड, विलास जेऊरकर, अजय पुजारी यांनी केली आहे. सहनिर्माते सतीश लिंगाडे आहेत. मुख्य कलाकार म्हणून अभिनेत्री पिया कोसुंबकर यांनी काम केले आहे. तर सह कलाकार म्हणून पूजा वाघ, प्रसाद खैरे, रोहित पवार, धनंजय नारखेडे, चिराग चौधरी, सेजल गायकवाड, बालकलाकार अर्णव चावक यांनी काम केले आहे.

सीए अरविंद भोसले म्हणाले की, “भावना” हा माझा चौथा लघुपट आहे. यावपूर्वी एडिक्शन वर्सेस अटॅचमेंट, बायकॉट ट्रेस, आय ओपनर, हे सामजिक संदेश देणारे लघुपट बनविले आहेत. “भावना” या सामाजिक लघुपटाला दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप आनंद होत असल्याची “भावना” त्यांनी व्यक्त केली.