पिंपरी : शिवसेनेचे उपशहरप्रमुख हरेश नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा काळेवाडी आणि रहाटणी प्रभागातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला. यावेळी नखाते यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
हरेश नखाते यांच्या काळेवाडी, ज्योतिबा नगर येथील जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी सकाळी 9:30 ते दुपारी 3 या वेळेत हे शिबीर संपन्न झाले. यावेळी शहर संपर्कप्रमुख वैभव थोरात, युवा नेते विश्वजीत बारणे, कामगार नेते इरफान सय्यद, उपजिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शहराध्यक्ष सचिन भोसले, माजी शहराध्यक्ष योगेश बाबर, राजेश वाबळे, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सरपंच गोविंद वलेकर, अनंत कोऱ्हाळे, बशीर सुतार, दस्तगीर मनियार, नरेश खुळे, चंद्रकांत तापकीर, सचिन काळे, रमेश काळे, बाबासाहेब भोंडवे, दीपक जाधव, जेष्ठ नागरिक पद्माकर जांभळे, सुखदेव खेडकर, काळुराम नढे, काळुराम कवितके या मान्यवरांच्या हस्ते या भव्य महाआरोग्य शिबिराचे उदघाट्न करण्यात येणार आले.
या शिबिरात चिंचवडच्या लोकमान्य हॉस्पिटल, लोकमान्य आयुर्वेदिक विभाग, थेरगाव येथील ब्लू वेल हेयरिंग केअर तसेच डी.वाय. पाटील हॉस्पिटल आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटल या रुग्णालयांच्या डॉक्टरांनी सहकार्य केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरातही प्रभागतील तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. सहदेव गोळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
दरम्यान, हरेश नखाते यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस मदतीचा धनादेश देण्यात आला. हा धनादेश कार्यक्रमाचे सूत्रसंचालक व समितीचे सदस्य राजाराम सावंत यांनी स्वीकारला.