प्रबुद्ध संघातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पिंपरी : चिंचवडगाव येथे प्रबुद्ध संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदविला व आपले मनोगत व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते प्रदिप पवार यांनी सध्या देशात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. संविधाननूसार राज्यकर्ते कारभार करत नसताना दिसतात, या साठी संविधान जनजागृती करणे गरजेचे आहे. असे सांगितले.
या वेळी प्रबुद्ध संघाचे माजी सचिव किशन बलखंडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याप्रमाणे संविधान कितीही चांगले असले तरी राबविणारे जर वाईट असतील संविधान चांगले ठरविणार नाहीत व राबविणारे चांगले असतील तर संविधान चांगलेच ठरवतील.
या वेळी पारबते गुरुजी, डॉ. धर्मेंद्र रामटेके, अशोक कदम, प्रतिमा साळवी, किशोर सोनवणे, प्रमोद साळवी, अनुराधा सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. झेंडा वंदन अध्यक्षा...