लोकमराठी न्यूज नेटवर्क : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रबुद्ध संघाच्या वतीने अभिवादन रॅली काढण्यात आली. या मध्ये प्रबुद्ध संघाच्या सभासदांनी व नागरीकांनी सहभाग नोंदविला. ही रॅली यशस्वी करण्यासाठी प्रबुद्ध संघाचे पदाधिकारी राजू वासनिक, दिलीप गोडबोले, सुधीर कडलग यांनी प्रयत्न केले.
सुरूवातीला बुद्ध वंदना घेऊन घेऊन रॅली ची सुरुवात केली. ही रॅली संपूर्ण चिंचवड गाव मधून काढण्यात आली. शेवटी अभिवादन सभेत डॉ धर्मेंद्र रामटेके, निशांत कांबळे, प्रतिमा साळवी, अल्पना गोडबोले यांनी विचार मांडले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन सचिव किशन बलखंडे यांनी केले. शेवटी धम्म पालन गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.