एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिवस संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिवस संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर सन्मान प्राप्त होतो.कितीही अडचणी आल्या तरी यशाचा मार्ग सोडू नका.रागात कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा. तरच इतरांबद्दल आपण सहिष्णुता ठेवू शकतो, असे विचार मुनेश मोहन कालिया यांनी मांडले. ते एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिवस संपन्न

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन .एस. गायकवाड होते. ते म्हणाले की, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सहिष्णुतेची भावना फार महत्त्वाची आहे.सर्वधर्मसमभाव जोपासणे ही सुद्धा सहिष्णुतेची भावना आहे.जगात भारत देश त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. निशा गोसावी यांनी केले. आभार डॉ. एस. बी. जगताप यांनी मानले. या समारंभाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन सेवक उपस्थित होते.