रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप
पुणे, दि.२८ (लोकमराठी) - हातावर पोट असणाऱ्या अनेक महिलांना मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यातील अनेकींना घरगुती स्वरूपाचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र, भांडवलाअभावी अनेकांचे स्वप्न हे अपूर्णच राहते.नेमकी हीच गरज ओळखून रमजान ईद निमित्त शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) गटाच्या वतिने गुरूवारी दि.२७ रोजी आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटप केले. व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्मा वाटप तसेच जेवनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वडगावशेरीतील शिवराज शाळेजवळ सोमनाथ नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आपण आता स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, या जाणीवेने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतज्ञतेचे हसू फुलले. गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्माचे वाटप मह...