१८ फेब्रुवारी रोजी मराठ्यांची गौरवगाथा महानाट्याचे आयोजन

रायगड, दि.४ (लोकमराठी) – १८ फेब्रुवारीला “मराठ्यांची गौरवगाथा” महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.(निर्मित/ लिखित/ दिग्दर्शित )प्रवीण नंदकुमार देशमुख यांनी शिवदुर्ग मित्र प्रस्तुत “मराठ्यांची गौरवगाथा” या महानाट्याची अधिकृत घोषणा केली.

२फेब्रुवारी १६६१ रोजी कर्तलबखानाच्या बलाढ्य सैन्याचा छत्रपती शिवाजी महाराज व सरनोबत नेताजी पालकर यांच्या सैन्याने गनिमी कावा या युद्धनीतीने संपूर्ण पराभव केला त्यांना शरणागती पत्करायला लावली व शिवाजी महाराजांचा मोठा विजय झाला म्हणूनच २फेब्रुवारी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो, यावर्षी ३६२ वा विजय दिन सोहळा उंबरखिंडीमध्ये साजरा करण्यात आला.

याचे आयोजन पंचायत समिती खालापूर, जिल्हा परिषद, तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले याच दिवसाचे औचित्य साधून शिवदुर्ग मित्र प्रस्तुत प्रवीण नंदकुमार देशमुख (निर्मित/ लिखित/ दिग्दर्शित ) “मराठ्यांची गौरवगाथा” या महानाट्याची अधिकृत घोषणा करण्यात आली सदर महानाट्यामध्ये १०० फुटी दोन मजली भव्य रंगमंच तसेच रंगमंचावर प्रत्यक्ष घोडे, उंट, बैलगाडी यांचा वावर असणार आहे,या महानाट्यामध्ये आक्रमक शौर्य लढाया, जिवंत तोफा यांचा समावेश असणार आहे.

तसेच या महानाट्या मध्ये २०० कलाकार सहभागी होणार आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदीप्यमान इतिहास दाखवण्यात येणार आहे, या प्रयोगाचे आयोजन हे “सकल मराठा समाज तालुका अंबरनाथ बदलापूर” यांच्यावतीने करण्यात आलेले असून हा प्रयोग तालुका क्रीडा संकुल मैदान बदलापूर पूर्व या ठिकाणी पार पडणार आहे,,, श्री शिवशंभूंचा धगधगता इतिहास पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज तालुका अंबरनाथ बदलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवर शिवदुर्गचे सचिव सुनीलजी गायकवाड, आनंदजी गावडे, प्रविणजी देशमुख,सकल मराठा समाज बदलापूर यांचा वतीने अविनाशजी देशमुख, संतोषजी रायजाधव, अरुणजी चव्हाण, मनोजजी जाधव, चावणी ग्रामस्थ, पंचायत समिती सदस्य, जिल्हापरिषद सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.