एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री. अंकुश कारकर यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, उपाध्यक्ष मा. आमदार चेतन (दादा) तुपे पाटील यांनी दोन्ही सत्कारमूर्ती यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, जनरल बॉडी सदस्य मा. दिलीप (आबा) तुपे यांनी दोन्ही सत्कारमूर्तीना शुभेच्छा दिल्या.

भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.महेंद्र पाटील व कार्यालयीन सेवक श्री.अंकुश कारकर यांनी नोकरीला नोकरी न समजता रयत शिक्षण संस्थेत सेवा म्हणून काम केले. हे रयतेचे दोन्ही गुणी सेवक असल्याचे गौरवउद्गार प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी काढले. याप्रसंगी अनंतराव पवार कॉलेज पिरंगुट येथील प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी म्हणाल्या विद्यार्थ्यांच्या जडण घडणीमध्ये प्राध्यापकांचे स्थान महत्वाचे आहेच. पण त्याच बरोबर कार्यालयीन सेवकांचे योगदानही महत्वाचे आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा आणि वारसा घेवून रयत सेवक काम करीत आहेत. म्हणून रयत शिक्षण संस्थेमधून उत्तम दर्जाचे विद्यार्थी घडत आहेत. असे मत प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी यांनी व्यक्त केले.

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये सेवापुर्ती सत्कार समारंभ संपन्न

कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ.एन.बी.चव्हाण, प्रा.डॉ.महेंद्र पाटील व श्री.अंकुश कारकर, डॉ. किशोर काकडे, डॉ. इंदिरा पाटील, डॉ.मल्हारी रास्ते, प्रा.अजित जाधव इत्यादींनी आपली मनोगते व्यक्त केली. स्टाफ वेल्फरचे चेअरमन डॉ.अतुल चौरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. तर पाहुण्यांचा परिचय डॉ.शहाजी करांडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम व प्रा.प्रसाद वाळिंबे यांनी केले. आभार डॉ.अशोक पांढरबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्राध्यापक, कार्यालयीन सेवक, विद्यार्थी वर्ग, सत्कारमूर्ती यांचे कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.