प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट

प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट 

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी महाविदयालयातील मानसशास्त्र विभागाचे विद्यार्थी व शिक्षकांनी प्रादेशिक मानसिक रुग्णालय येरवडा येथे भेट दिली. सदर भेटीमध्ये सर्व विदयार्थ्यांना रुग्णालयाची परिपूर्ण माहिती रुग्णालयाचे सामाजिक अधिकारी मोहन बनसोडे यांनी दिली.

रुग्णालयात रुग्ण दाखल करण्याची प्रक्रिया, नवीन कायद्या संदर्भातील माहिती, तसेच रुग्णांची दैनंदिन दिनचर्या याविषयी प्रात्यक्षिक दाखविले. रुग्णांसाठी उपचार पध्दती कोणत्या स्वरूपात दिल्या जातात उदा: डान्स थेरपी, म्युझिक थेरपी, स्पंज थेरपी याची माहीती दिली. तसेच त्या रुग्णांना उपचार पद्धती कशा प्रकारे उपयोगी पडते यांची माहीती दिली. रुग्णालयामध्ये असलेल्या महिला रुग्ण व पुरुष रुग्ण यांचे विकृती संदर्भात : वर्तन कसे होते. यांची माहिती दिली. त्यांना दिला जाणारा आहार आणि त्यांचे वेळापत्रक यांची माहिती दिली.

प्रादेशिक मानसिक रुग्णालयास एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट 

रुग्णांसाठी बनविण्यात आलेला व्यवसाय वॉर्ड दाखविण्यात आला. मोहन बनसोडे सरांनी त्यांनी उपचार केलेल्या एका रुग्णाची वृत्तइतिहास सांगितला. त्याचे उपचार करताना येणारे अनुभव त्यांनी विद्यार्थाना विशद केले. विद्यार्थीच्या प्रश्नांचे देखील त्यांनी खूप चांगल्या प्रकारे निरसन केले. रुग्णालयाच्या सामाजिक आधिकारी रोहिणी भोसले यांनी मानसशास्त्र विषयाच्या भविष्यातील व्यवसाय संधी याविषयी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले.

रुग्णालयातील भेट यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड तसेच सामाजिक अधिक्षक गिते सर, प्रादेशिक मानसिक रुग्णालय अधिक्षक गिता कुलकर्णी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. सदर भेटीमध्ये मानसशास्त्र विषयाचे 45 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत मानसशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्रा. महेश देवकर व सहाय्यक प्रा.अप्सरा लोखडे उपस्थित होत्या.