सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी व पुतण्याची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःलाही गोळी झाडून संपवलं

सहाय्यक पोलीस आयुक्ताने पत्नी व पुतण्याची गोळ्या झाडून केली हत्या; स्वतःलाही गोळी झाडून संपवलं

पुणे (लोकमराठी न्यूज) : एका सहाय्यक पोलीस आयुक्तांने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वता:वर गोळी झाडून आपले जीवन संपवलं आहे. ही धक्कादायक घटना आज (ता. २४ जुलै २०२३) पहाटे घडली असून ही बातमी समजताच एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.

भारत गायकवाड (ACP Bharat Gaikwad) असे त्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. तर मोनी गायकवाड (वय ४४) असे पत्नीचे तर दीपक गायकवाड (वय ३५) असे पुतण्याचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे अमरावती पोलीस (Amaravati Police) दलात सहाय्यक आयुक्त पदी कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला आहे. सहाय्यक आयुक्त गायकवाड हे पुण्यात आपल्या कुटूंबाकडे आले होते. त्यांनी मध्यरात्री चारच्या सुमारास पत्नीचा व पुतळ्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.