प्रा. राजेंद्र गायकवाड यांची ‘प्रविण प्रशिक्षक’पदी नियुक्ती

प्रा. राजेंद्र गायकवाड यांची 'प्रविण प्रशिक्षक'पदी नियुक्ती

अहमदनगर, ता. २३ : ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीसाठी अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये प्रा. राजेंद्र गायकवाड यांची ‘ प्रविण प्रशिक्षक ‘ (Master trainer) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

शाश्वत विकास संकल्पना अंतर्गत केंद्र सरकारच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार शासनाकडून राज्य ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटी करणासाठी त्यांच्याकडे कार्यभार असणार आहे. राज्य ग्रामीण विकास संस्था, यशदा, पुणे या शासनाच्या संस्थेत त्यांचे प्रशिक्षण झाले आहे.

निवेदक, सूत्रसंचालक व व्याख्याते म्हणून सुप्रसिद्ध असलेले प्रा. राजेंद्र गायकवाड हे अभ्यासू आणि अनुभवी व्यक्तिमत्त्व असल्यामुळे त्यांचा सर्वांनाच विशेष फायदा होईल. अशी जनसामान्यांकडून भावना व्यक्त करण्यात येत आहे.