आरोग्य

सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
आरोग्य, मोठी बातमी

सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न

पिंपरी चिंचवड : हृदयाला जोडणारी मुख्य धमनी फाटलेल्या २१ वर्षीय तरूणावर सिनेर्जी हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये जटील अशी बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली. सुमारे सात ते आठ चालणाऱ्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावून तरूणाला जीवनदान दिले. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल (Dr Gautam Jugal) व डॉ. सचिन हुंडेकरी (Dr Sachin Hundekari) , ह्रदय शल्य चिकित्सक डॉ. स्मृती हिंदारीया (Dr Smurti Hindaria) , भुलतज्ञ डॉ. सुहास पाटील (Dr Suhas Patil) यांचा सहभाग होता. अक्षय माने असे या तरूणाचे नाव असून छातीत व पाठीत तिव्र वेदना आल्यामुळे तो सिनेर्जी हॉस्पिटल येथे आला असता, ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल यांनी पुर्ण तपासणीअंती, त्याला एओर्टिक एन्युरिझम (महाधमनी विकार) व टाईप-ए-एओर्टीक डिसेक्शन म्हणजेच महाधमनी विच्छेदन असल्याचे नि...
डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू
पिंपरी चिंचवड, आरोग्य

डॉ. तारिक शेख यांचे तापकीर चौकात क्लिनिक सुरू

उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते झाले उद्घाटन काळेवाडी : अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध डॉ. तारिक शेख (Dr Tariq Shaikh) व डॉ. आस्मा शेख (Dr Asma Shaikh) यांचा काळेवाडी येथील तापकीर चौकात 'राहत क्लिनिक' या नावाने दवाखाना सुरू झाला आहे. या क्लिनिकचे उद्घाटन उद्योजक मल्हारी शेठ तापकीर यांच्या हस्ते गुरूवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी केमिस्ट असोसिएशन ॲाफ पुणे डिस्ट्रीक्टचे उपाध्यक्ष विवेक तापकीर, दंत चिकित्सक डॉ. राजू कुंभार, ओझनटेक सोलूशनचे संचालक प्रसाद गुप्ते, मोहम्मद सलीम बेलीफ, प्रशांत भोसले, संतोष जाधव, डॉ. तारिक शेख, डॉ. आस्मा तारिक शेख, पत्रकार रविंद्र जगधने, कालीदास जगधने, अजय वायदंडे आदी उपस्थित होते. अहमदनगर जिल्ह्यातील खेडोपाड्यात, वाड्या-वस्त्यांवर जाऊन डॉ. शेख यांनी सेवा दिली आहे. रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून आपले कर्तव्य बजावणारे डॉ....
एड्सच्या जनजागृतीसाठी ‘सक्षम’कडून आरोग्य तपासणी शिबिर
आरोग्य, पिंपरी चिंचवड

एड्सच्या जनजागृतीसाठी ‘सक्षम’कडून आरोग्य तपासणी शिबिर

पिंपरी : सक्षम फाउंडेशन व असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टस पिंपरी चिंचवड यांच्यावतीने निगडी- ट्रान्सपोर्टनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी (health checkup) शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात स्थलातरीत कामगारांना एड्सबद्दल माहिती देऊन, जनजागृती (AIDS Awareness Camp) करण्यात आली. या शिबिराचा ७५ जणांनी लाभ घेतला. यामध्ये सक्षम फाउंडेशनमार्फत (Saksham Foundation) या परजिल्ह्यातील कामगारांची एचआयव्ही तपासणी करून औषध पुरवठा करण्यात आला. यावेळी कामगारांना फाउंडेशनच्या प्रकल्प व्यवस्थापक स्नेहल माहुलकर यांनी एड्सबद्दल माहिती देऊन जनजागृती केली. त्यावेळी स्नेहल माहुलकर म्हणाल्या की, ‘‘एचआयव्ही चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टसच्या मदतीने स्थलारीत कामगार व मालक यांच्या युनियन यांना सोबत घेऊन एक मोहीम राबवित आहोत.’’ शिबिर...
युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन
आरोग्य, पिंपरी चिंचवड

युवकांनी सुरक्षित राहून जीवनाचा आनंद घ्यावा | मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांचे आवाहन

चिंचवड : मंथन फाउंडेशन, रिलीफ फौंडेशन, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, जिल्हा एड्स नियंत्रण केंद्र, पुणे, जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संघवी केशरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चिंचवड येथे एचआयव्ही एड्स जनजागृती करण्यात आली. मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी व्याख्यान दिले. युवक युवती यांना एचआयव्ही म्हणजे काय? एड्स व एचआयव्ही मधील फरक समजून सांगितला. एचआयव्ही कसा होतो, त्याचा इतिहास यावर माहिती दिली. तसेच एचआयव्ही चाचणी सर्व सरकारी रुग्णालय व काही एचआयव्हीवर काम करणाऱ्या संस्था मोफत तपासणी करतात व त्याचा अहवाल गोपनीय ठेवला जातो. प्रत्येकाने एचआयव्ही तपासणी करून घेतली पाहिजे, ती काळजी गरज आहे, असे त्यांनी सांगितले. एचआयव्हीबाबत युवकांनी पुढाकार घेऊन जनजागृती केली पाहिजे. संवेदनशील झाले पाहिजे, जबाबदारी घेतली पाहिजे आणि सुरक्षित राहू...
कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे
मोठी बातमी, आरोग्य, राष्ट्रीय

कोरोनाचा नवीन स्ट्रेन देशात प्रवेश करू नये, याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे

डॉ. प्रकाश कोयाडे गेल्या दोन दिवसांत कोविड संबंधित अचानक बातम्या येऊ लागल्या आहेत. तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा होऊ लागली आहे. कोरोनाबद्दल सोशल मीडिया आणि टीव्ही वरील सुरू झालेल्या चर्चेवरून समज-गैरसमज आणि अफवांचं पीक उठणार आहे. एक भीतीचं वातावरण तयार होऊन येत्या आठवड्याभरात आपण पॅनिक अवस्थेत जाऊ की काय अशी परिस्थिती येण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा नवीन स्ट्रेन 'Omicron चे दोन रुग्ण बेंगलोरमध्ये सापडले असून ते दक्षिण आफ्रिकेचे रहिवासी आहेत. त्यांचे अजून काही रिपोर्ट यायचे बाकी आहेत. नेमके किती म्युटेशन झाले आहे याबद्दल माहिती येणं बाकी आहे. सध्यातरी एकाही भारतीयांमध्ये हा विषाणू सापडला नाही. या स्ट्रेन बद्दल बरेच तर्क-वितर्क सुरू आहेत. लक्षणं असणार नाहीत, नाक-घशात हा विषाणू प्रकार सापडत नाही डायरेक्ट फुफ्फुसात जातो, शेवटच्या टप्प्यात आल्यानंतरच हा डिटेक्ट होतो वगैरे चर्चा सुरू...
निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचा – कुंदा भिसे
आरोग्य, पिंपरी चिंचवड

निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचा – कुंदा भिसे

उन्नती सोशल फाऊंडेशनचा 'निरोगी आणि सशक्त पिंपळे सौदागर'चा संकल्प पिंपळे सौदागर : निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचे असल्याचे हजारो वर्षांपासून सांगितले आहे. योगामुळे विविध आजारांवर मात करता येते. असे प्रतिपादन उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी येथे कैले. पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत योग शिबीर सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 'निरोगी आणि सशक्त पिंपळे सौदागर'चा संकल्प फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे बोलत होत्या. सदर शिबीर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर असे सात दिवस होणार आहे. पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसायटी या ठिकाणी रोस लँड सोसायटीचे चंदन चौरसिया यांचे हस्ते रिबीन कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. तसेच फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, योग शिक्षक व होमिओप...
पोलिस आयुक्तालयात झाले ‘बंद पडलेले हृदय चालू ठेवण्याचे प्रात्यक्षित’
पिंपरी चिंचवड, आरोग्य

पोलिस आयुक्तालयात झाले ‘बंद पडलेले हृदय चालू ठेवण्याचे प्रात्यक्षित’

चिंचवड : १६ ऑक्टोबर हा जागतिक भुलतंत्र दिवस. डॉ. विल्यम थॉमस ग्रीन मॉर्टन ह्या शास्त्रज्ञाने सोळा ऑक्टोबर १८४६ या दिवशी पहिली भूल दिली होती. हे औचित्य साधून जगभरात हा दिन जागतिक भूल तंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो. पिंपरी चिंचवड भूलतज्ञ संघटनेच्या वतीने पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयात हा दिवस, बंद पडलेले हृदय चालू करण्याचे "जीवन संजीवनी" हे प्रात्यक्षिक दाखवून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा सहाय्यक आयुक्त श्रीकांत दिसले यांच्या हस्ते पार पडला. उपस्थित भूल तज्ज्ञांनी उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांकडून कृत्रिम मानव देहावर प्रत्यक्षित करवून घेतले. सामान्य माणसांत भूल तज्ञांचे काम फक्त भूल देण्याचे असते, असा समज असतो. परंतु, भुलतज्ञांचे काम फक्त भूल देण्या पुरते मर्यादित नसून, ऑपरेशन दरम्यान नाडीचे ठोके कमी जास्त झाल्यास, रक्तदाब कमीजास्त कमीजास्त झाल्यास, अचानक रक...
डॉ. मनीषा गरूड यांना ‘डीडीआय आरोग्य सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान
पुणे, आरोग्य

डॉ. मनीषा गरूड यांना ‘डीडीआय आरोग्य सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान

पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : डी डी आय आरोग्य सन्मान हा राज्यस्तरीय जूरी आधारित अवॉर्ड समारोह नुकताच मुंबईील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आयुर्वेद मॉडर्न मेडिसिन होमिओपॅथी दंतवैद्यक शास्त्र आणि परिचारिका विभाग ८० नोमिनीस मधून २० अंतिम निवडले गेले. प्रत्येक विभागातून चार जूरी नेमण्यात आले. त्यापैकी एकच महिला वूमन डेंटल कौन्सिलचा राष्ट्रीय सचिव डॉ. मनीषा गरुड यांची नेमणूक झाली होती. दरम्यान, दंत विभागात चंद्रपूरचे डॉ. राजीव बोरले यांना जीवन गौरव पुरस्कार आणि ठाण्याचे डॉ. अनिश नवरे यांना रफीउद्दीन अहमद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी डी आय चे पदाधिकारी डॉ.मनोज देशपांडे, डॉ. देवेंद्र हंबर्डेकर, डॉ. गिरीश कामत यांचेही आरोग्य सन्मान पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी सगळ्या प...
काळेवाडी गावठाण महापालिका शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू
पिंपरी चिंचवड, आरोग्य

काळेवाडी गावठाण महापालिका शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू

नगरसेविका निता पाडाळे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी : नागरिकांना सोईस्कर होईल याकरिता काळेवाडीत कोविड-१९ लसीकरण केंद्र आवश्यक होते. यासाठी नगरसेविका निता पाडाळे यांचा महापालिकेकडे सतत पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून महापालिकेच्या वतीने काळेवाडी गावठाण येथे महापालिकेच्या शाळेत कोविड-१९ लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आले आहे. काळेवाडीतील या लसीकरण केद्रांत १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी कोविड-१९ लसीकरण करावे. जेणेकरून कोरोना या महामारीपासून आपले संरक्षण होईल. असे आवाहन नगरसेविका निता पाडाळे यांनी केले आहे. याबाबत नगरसेविका पाडाळे म्हणाल्या, काळेवाडीतील अनेक वयोवृद्ध नागरिक व महिला यांना इतर ठिकाणी लसीकरणासाठी जाण्यास अडचणी येत होत्या. त्यासाठी महापालिका आयुक्त व आरोग्य विभाग यांच्याकडे बऱ्यादा पत्रव्यवहार केला, तसेच ...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात दंत आरोग्य चिकित्सा मार्गदर्शनपर उपक्रम संपन्न
आरोग्य, पुणे

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात दंत आरोग्य चिकित्सा मार्गदर्शनपर उपक्रम संपन्न

औंध : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, प्राथमिक विद्यामंदिर व जिल्हा आरोग्य केंद्र, औंध यांच्या संयुक्त विद्यमाने 'दंत आरोग्य चिकित्सा' मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी दंतवैद्य जिल्हा रुग्णालय औंध येथील डॉ. सुहासिनी घाणेकर (Dr. Suhasini Ghanekar ) या उपस्थित होत्या. त्यांनी प्राथमिक शाळेतील मुलांना व पालकांना मार्गदर्शन केले. त्यांनी सुरुवातीला चांगल्या दातांचे महत्त्व पटवून दिले. दात खराब असतील, किडलेले असतील, तुटलेले असतील, वाकडेतिकडे उगवले असतील तर अशा व्यक्तीचे सौंदर्य लोप पावते. मुलांचे दात दुखत असतील तर मुले रात्रभर पालकांना झोपू देत नाही. पालकांचे दात दुखत असतील तर वेदना जाणवल्यामुळे कामावर लक्ष लागत नाही. यासाठी दातांची निगा प्रत्येकाने राखली पाहिजे. मुलांचे व पालकांचे...