निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचा – कुंदा भिसे

निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचा - कुंदा भिसे
  • उन्नती सोशल फाऊंडेशनचा ‘निरोगी आणि सशक्त पिंपळे सौदागर’चा संकल्प

पिंपळे सौदागर : निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचे असल्याचे हजारो वर्षांपासून सांगितले आहे. योगामुळे विविध आजारांवर मात करता येते. असे प्रतिपादन उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी येथे कैले.

पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने मोफत योग शिबीर सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘निरोगी आणि सशक्त पिंपळे सौदागर’चा संकल्प फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला. त्यावेळी फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे बोलत होत्या.

निरोगी आणि सुदृढ शरीरासाठी योगाभ्यास महत्त्वाचा - कुंदा भिसे

सदर शिबीर 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर असे सात दिवस होणार आहे. पिंपळे सौदागर येथील जरवरी सोसायटी या ठिकाणी रोस लँड सोसायटीचे चंदन चौरसिया यांचे हस्ते रिबीन कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

तसेच फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, योग शिक्षक व होमिओपॅथी तज्ञ स्वाती माळी, प्रशांत पाटील, राजेंद्रनाथ जयस्वाल, रमेश वाणी, योग शिक्षक माया मॅडम यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी आनंद हास्य क्लबचे सदस्य, जेष्ठ नागरिक आणि विविध सोसायटीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना कुंदा भिसे म्हणाल्या की, “मानवी शरीरात प्रभावी अशी स्वयं उपचार शक्ती आहेत. रोग प्रतिबंधक यंत्रणा आहे. मात्र, ही शक्ती टिकवण्यासाठी योगाभ्यास महत्त्वाचा आहे. आपण यापूर्वी ‘ग्रीन पिंपळे सौदागर’चा संकल्प केला आहे. त्याचबरोबर या योग शिबिराच्या माध्यमातून आपण ‘निरोगी व सशक्त पिंपळे सौदागर’ असा संकल्प करूया.” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

दरम्यान, चंदन चौरसिया यांनी उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई भिसे यांच्या कार्याचे म्हणजे त्या उन्नति सोशल फाउंडेशन मार्फत नेहमी उपक्रम राबवत असतात व सर्व उपक्रम हे समाजपयोगी असतात, असे म्हणत कौतुक केले.