एम.एम. तंत्रनिकेतनच्या सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र

एम.एम. तंत्रनिकेतनच्या सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र

पिंपरी चिंचवड : येथील एम.एम तंत्रनिकेतनच्या संगणक विभागातील सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र देण्यात आले. बाह्यपरीक्षका समोर ३८ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील सात प्रकल्प कॉपी राईट प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आली, त्यातील सहा प्रकल्पाना प्रमाणपत्रे मिळाले असून एक प्रकल्प मंजूर झाला असून प्रमाणपत्र यायचे बाकी आहे अशी माहिती संगणक विभागाचे प्रमुख विकास सोळंके यांनी दिली.

नाविन्यपूर्ण संशोधनाचा ध्यास घेतलेल्या एम.एम तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक प्रकल्प निवडताना दररोज भेसवणाऱ्या अडचणींना तंत्रज्ञनाच्या माध्यमातून कश्या सोडवता येतील या वर भर दिला जातो. अश्या सर्व प्रकल्पना संशोधकीय नियतकालिकात प्रकाशित केले जाते. मागील वर्षी ३२ प्रकल्प नियतकालिकात प्रकाशित झाले यात ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञनाचा योग्य वापर आणि आर्थिक मदत यामूळे एम एम चे विद्यार्थी नावीन्य पूर्ण प्रकल्प सादर करत आहेत. काही दिवसापूर्वी दोन प्रकल्पासाठी पेटंट सुद्धा दाखल केले असून, इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) कॉलेजवर तयार करून त्यावर संशोधन केले जाणार असल्याची माहिती प्राचार्या गीता जोशी यांनी दिली. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, सचिव किशोर मुंगळे यांनी सर्व प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.