भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई

भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई

पिंपरी : भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी बेकायदेशीर फलक आणि होर्डिग्ज सर्वत्र झळकले आहे. फूटपाथ, चौका-चौकात, रस्त्यावर हे फलक लागल्याने शहराच्या विद्रुपीकरणात आणखी भर पडली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अनधिकृत फलक, होर्डिग्ज काढण्याचे आदेश क्षेत्रीय अधिका-यांना कारवाईचे दिले. त्यानूसार महापालिकेच्या ई आणि क प्रभागात शुक्रवारी (ता. २६) अनधिकृत फलक काढण्यात सुरुवात केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांचा शनिवारी वाढदिवस आहे. आगामी २०२२ च्या महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरभर आमदार लांडगे यांचे ब्रॅडींग आणि वातावरण निर्मिती करण्यासाठी फलक लावण्यात आले आहेत. त्यानूसार भोसरी विधानसभा मतदार संघात त्यांच्या इच्छुक उमेदवार, समर्थक, कार्यकर्त्यांनी प्रत्येक चौका-चौकात, फूटपाथवर, रस्त्यावर अडथळा ठरणारे फलक, होर्डिग्ज झळकले लावले आहेत.

भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई

कोरोना संसर्गामुळे गतवर्षी आमदार लांडगे यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही. त्यामुळे वाढदिवसाचे निमित्त साधून कार्यकर्त्यांनी भोसरी विधानसभा मतदार संघाच्या कानाकोप-यात अनधिकृत फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या. नेत्याचं प्रेम व्यक्त करताना पालिकेच्या नियम पायदळी तुडवले आहेत. मोशी, चिखली, च-होली, डुडुळगाव, दिघी, भोसरी, पिंपरी, संत तुकारामनगर, निगडी या भागासह भोसरी परिसरात लांडगे यांचे फ्लेक्स झळकत आहेत. नियमाचे उल्लंघन करून अनधिकृत फ्लेक्स लावल्याने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी हे बेकायदेशीर फ्लेक्स तत्काळ हटविण्याचे आदेश क्षेत्रीय अधिका-यांना दिले आहेत.

भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बेकायदा फलकांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूका निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन आमदार लांडगे यांनी इच्छुकांना मतदारांना इव्हेंट घेण्यावर भर दिला आहे. रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, सायक्लोथॉन, चला हवा येऊ द्या, खेळ रंगला पैठणी सारखे असंख्य इव्हेंट घेण्याचे नगरसेवकांना टार्गेट दिले आहे. दिलेले टार्गेट उत्तमपणे पार पाडावे, यासाठी संबंधितांनी त्या-त्या भागात फ्लेक्सबाजी केली आहे.

दरम्यान, शहरातील लागलेले फलक परवानगी न घेता लावले आहेत. उद्या वाढदिवस असताना आज अचानक महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, बीट अधिका-यांना फलक काढण्याचे आदेश दिले आहेत. त्यानूसार शहरातील अनधिकृत फलक काढण्याची मोहीम क, फ आणि ई प्रभाग क्षेत्रीय अधिका-यांनी घेतली आहे. त्यानूसार शंभरहून अधिक किआॅक्स, लाडकी फलक काढत मोठी कारवाई केली आहे.