मोठी बातमी

Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
महाराष्ट्र, ताज्या घडामोडी, मोठी बातमी

Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

पुणे (लोकमराठी न्यूज) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासन...
Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ! दिल्ली बुडाली
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

Delhi flood: यमुना नदीच्या पातळीत वाढ! दिल्ली बुडाली

नवी दिल्ली : दिल्लीतील यमुना नदीचे पाणी सतत विकराल रूप धारण करित आहे. 46 वर्षांचा विक्रम मोडत पाण्याची पातळी 208 मीटरच्या पुढे गेली आहे. राजधानीतील सर्व सखल भाग पाण्यात बुडाला आहे. कश्मीरी गेट आयएसबीटीमध्ये अनेक फूट पाणी आहे. नेहमी गजबजणारा रिंगरोड सुनसान आहे. रिंगरोडवर यमुना नदीच्या पाण्यात उसळणाऱ्या लाटा आपल्याला समुद्राची आठवण करून देत आहेत. राजघाटापासून चांदगी राम आखाड्यापर्यंत ते पाण्यात बुडाले आहेत. दिल्लीतील सर्वात मोठे स्मशान बोधघाट बंद करण्यात आले आहे. त्यात अनेक फूट पाणी साचले आहे. https://youtu.be/lLG_PRuuFgw केंद्रीय जल आयोगानुसार हरियाणा बॅरेजमधून येणाऱ्या पाण्याची पातळी दुपारनंतर कमी होण्याची शक्यता आहे. दिल्लीचा लाल किल्ला देखील पाण्याखाली गेलाय. दिल्लीतील पूरसदृश परिस्थितीमुळे यमुनेच्या आसपासच्या भागातील शाळा रविवारपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. दिल...
‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी, शैक्षणिक

‘आरटीई’ च्या विद्यार्थ्यांना दुजाभाव ; एन एस यु आय आक्रमक

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : गरीब कुटुंबातील मुलांना सर्वसामान्यांप्रमाणे शिक्षण मिळावे या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) मूळ उद्देशाला धाब्यावर बसवण्याचा प्रकार चिंचवड येथील शाळेत घडला आहे. चिंचवड येथील एका नामांकित अशा इंटरनॅशनल स्कूल या शाळेत 'आरटीई' मधून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा वेगळा वर्ग करून त्यांना शाळेच्या मुख्य इमारातीपासून दूर वेगळ्या ठिकाणी त्यांना शिकवले जात असल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणाऱ्या या शाळेवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली असून शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नायकवडी यांच्याकडे ही तक्रार केली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील या शाळेत उच्चभ्रू वर्गातील मुले शिकतात 'आरटीई' च्या नियमानुसार शाळेला 25% प्रवेश गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना देणे बंधनकारक आहे, शाळेने ही प्रक्रिया पूर्ण केली; पण शाळा सुरू...
नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला 
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला

लोकमराठी न्यूज नेटवर्क | १ जुलै २०२३ बुलढाणा : येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, ति...
केरळमधील YouTubers चे वार्षिक उत्पन्न ₹2 कोटींपर्यंत ; प्राप्तिकर छाप्यांमध्ये 25 कोटींचा घोटाळा उघड
राष्ट्रीय, मोठी बातमी

केरळमधील YouTubers चे वार्षिक उत्पन्न ₹2 कोटींपर्यंत ; प्राप्तिकर छाप्यांमध्ये 25 कोटींचा घोटाळा उघड

मुंबई, ता. 27 : आयकर (आयटी) विभागाने केरळमधील कोची आणि कोझिकोड भागातील लोकप्रिय यूट्यूबर्सच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले आहेत. वृत्तानुसार, आयटी विभागाने शुक्रवारी दहा लोकप्रिय यूट्यूबर्सवर छापे टाकले. रिपोर्ट्सनुसार, आयकर विभागाकडे यूट्यूबर्सकडून गोळा केल्या जात असलेल्या कमाईबद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळेच आर्थिक माहिती गोळा करण्यासाठी विभागाने सर्वेक्षण म्हणून हा छापा टाकला. असे सांगण्यात येत आहे की या छाप्यामागे यूट्यूबर्सना आयकर नियमांची माहिती देणे हा आहे जेणेकरून करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये. या छाप्यात सुमारे 25 कोटींची करचोरी झाल्याचे विभागाला समोर आले. असे काही YouTubers होते ज्यांना अजिबात कर मिळाला नाही. विभागाकडून अशा यूट्यूबर्सना नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाने केरळमध्ये यूट्यूबर्सच्या घरांवर छापे टाकले आहेत....
सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न
आरोग्य, मोठी बातमी

सिनेर्जी हॉस्पिटलमध्ये ह्रदयाची अवघड बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या संपन्न

पिंपरी चिंचवड : हृदयाला जोडणारी मुख्य धमनी फाटलेल्या २१ वर्षीय तरूणावर सिनेर्जी हार्ट इन्स्टिट्यूट हॉस्पिटलमध्ये जटील अशी बेंटाल सर्जरी यशस्वीरित्या करण्यात आली. सुमारे सात ते आठ चालणाऱ्या या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांनी आपली सर्व कौशल्ये पणाला लावून तरूणाला जीवनदान दिले. या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल (Dr Gautam Jugal) व डॉ. सचिन हुंडेकरी (Dr Sachin Hundekari) , ह्रदय शल्य चिकित्सक डॉ. स्मृती हिंदारीया (Dr Smurti Hindaria) , भुलतज्ञ डॉ. सुहास पाटील (Dr Suhas Patil) यांचा सहभाग होता. अक्षय माने असे या तरूणाचे नाव असून छातीत व पाठीत तिव्र वेदना आल्यामुळे तो सिनेर्जी हॉस्पिटल येथे आला असता, ह्रदय रोग तज्ञ डॉ. गौतम जुगल यांनी पुर्ण तपासणीअंती, त्याला एओर्टिक एन्युरिझम (महाधमनी विकार) व टाईप-ए-एओर्टीक डिसेक्शन म्हणजेच महाधमनी विच्छेदन असल्याचे नि...
Infosys: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना दिली एक अप्रतिम भेट, कर्मचार्‍यांना मिळाले हे मोठे बक्षीस
राष्ट्रीय, मोठी बातमी

Infosys: आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिसने आपल्या कर्मचार्‍यांना दिली एक अप्रतिम भेट, कर्मचार्‍यांना मिळाले हे मोठे बक्षीस

Images Source : Google मुंबई, ता. 15 : आयटी कंपन्यांच्या कर्मचार्‍यांना त्यांच्या कंपनीकडून केवळ बोनस आणि प्रोत्साहनच मिळत नाही, तर काहीवेळा त्यांना त्यांच्या योगदानासाठी इक्विटी शेअर्सच्या स्वरूपात प्रोत्साहन देखील मिळते. देशातील आघाडीच्या आयटी कंपनी इन्फोसिसने (Infosys) असेच पाऊल उचलले आहे आणि आपल्या पात्र कर्मचाऱ्यांना 5.11 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सचे वाटप केले आहे. हे वाटप इन्फोसिसच्या दोन कर्मचारी संबंधित योजनांतर्गत करण्यात आले आहे आणि हे वाटप गेल्या आठवड्यात 12 मे रोजी झाले. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना शेअर्स का दिले?इन्फोसिसने हे शेअर्स आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत कारण काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल बक्षीस द्यायचे होते. याशिवाय कंपनीतील कर्मचाऱ्यांचे मालकी हक्क थोडे वाढले पाहिजेत, अशीही इन्फोसिसची इच्छा आहे. इन्फोसिसने 14 मे रोजी एका एक्सचेंज फाइलिंगमध...
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त 
राजकारण, मोठी बातमी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अध्यक्षपदावरून होणार निवृत्त

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक खुलासा केला. आपण अध्यक्षपदारुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या. माझे घर काँग्रेसच्या नव्हे तर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे होते. माझे वडील बंधू शेतकरी कामगार पक्षाचे नेते. परंतु महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीमुळे आम्ही काँग्रेसच्या जवळ जाऊ लागलो. मी यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांकडे आकर्षित झालो. त्यावेळी घरातील वातावरण वेगळे व माझे विचार वेगळे असे झाले. मी काँग्रेस पक्षाचा सदस्य झा...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पत्रावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. हे पत्र मीच काढलं होतं अशी कबुली देतानाच दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मी बारसूचं पत्र दिलं होतं. मी पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? आरेचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? रोज उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमद...
मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत
महाराष्ट्र, मोठी बातमी

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत

मयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली रत्नागिरी, दि.12 (जिमाका) : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती. आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यां...