पत्नीसोबत तीच्या मित्राला घरात पकडले | भोसकून दहाव्या मजल्यावरून दिले ढकलून
पिंपरी : पत्नीसोबत घरात सापडलेल्या तिच्या मित्राला धारदार शस्त्राने भोसकून गॅलरीच्या दहाव्या मजल्यावरून ढकलून दिले. यात पत्नीच्या मित्राचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. २६ ऑक्टोबर २०२२) रात्री साडे दहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील मोशीत घडली.
या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसात (Bhosari MIDC Police) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती पंकज शिंदे (वय ३५) याला पोलिसांनी अटक केली आहे. तर, निलेश अशोक जोर्वेकर (वय ३७) असे खून करण्यात आलेल्या पत्नीच्या मित्राचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पंकज शिंदे हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. दोन दिवसांपूर्वी मी गावाला जात आहे. असं पत्नीला सांगून तो घराबाहेर पडला. याच दरम्यान, पंकजच्या पत्नीला मयत निलेश अशोक जोर्वेकर भेटायला आला. पंकजची ...