महापालिका आयुक्तांकडून शहरातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे आश्वासन
पिंपरी चिंचवड : अपना वतन संघटनेच्या वतीने शहरातील कचरा समस्येविषयी आक्रमक भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या घरासमोर 'डस्टबीन' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार (दि. १५) ४ वाजता बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये अपना वतन संघटनेच्या वतीने अनेक मुद्दे मांडण्यात आले. या अर्ध्या तासातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आयुक्तांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.
बैठकीमध्ये उपस्थित केलेले मुद्दे :
१) शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला असून त्याचे ढीगच्या ढीग लागले आहेत. उदा - काळेवाडी, थेरगाव, वाकड, निगडी, चिंचवड, भोसरी परिसरात
२) शहरातील सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणवर कचरा अनेक दिवसांपासून पडलेला आहे. उदा - रोझ लॅन्ड सोसायटी, माँर्ट व्हर्ट सोसायटी इत्यादी
३) शहरातील झ...