एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम अधिक कडक; विना परवाना वाहन चालवल्यास पाच हजार दंड
मुंबई (लोकमराठी) : मोटार वाहन कायद्यातील बदलांमुळे एक सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. वाहतुकीचे नवीन नियम आधीपेक्षा अधिक कठोर असतील. वाहतूक परवान्याशिवाय गाडी चालवल्यास दंड दहापट करण्यात आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत.
ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दसपट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे.
वाहतुकीचे नवे नियम लागू करण्याबाबत विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात घडला, तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना तीन वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याचबरोबर ...