शिवजयंतीनिमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबची अतिशय दुर्गम भागातील भैरवगड व घनचक्कर गडावर यशस्वी चढाई

शिवजयंतीनिमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबची अतिशय दुर्गम भागातील भैरवगड व घनचक्कर गडावर यशस्वी चढाई

पिंपरी चिंचवड : शिवजयंती निमित्त फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचा 119 वा ट्रेक दिनांक 15 व 16 मार्च 2025 रोजी अतिशय दुर्गम भागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील, अकोले तालुक्यातील, शिरपुंजे गावामध्ये भैरवगड व घनचक्कर असे दोन गड येथे आयोजित केले होते. या ट्रेकमध्ये सर्वात लहान तीन वर्षाच्या आयुष रहाणे तसेच अनन्या बालघरे, राही जाधव, चिरायू बर्गे या बाल वीराने भाग घेतला होता. त्याचबरोबर भगवान खेडेकर वय 75 या ज्येष्ठ नागरिकांनी सह 85 सदस्यांनी भाग घेतला होता.

सकाळी पावणे साडेसहाला वाजता ट्रेकिंगला सुरुवात केली. सर्वात प्रथम फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे अध्यक्ष वसंत ठोंबरे यांनी सर्वांचे स्वागत करून सर्व सुरक्षिततेच्या नियम यासंबंधी सर्व सूचना दिल्या. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अतिशय दुर्गम अशा शिरपुंजे गावापासून ट्रेकिंगला सुरुवात झाली. घनचक्कर आणि भैरवगड यांच्यामधील घळीतून किल्ल्यावर जाणारी वाट आहे. गडाची उंची 11 49 मीटर समुद्रसपाटीपासून उंच आहे, तर घनचक्कर हा महाराष्ट्रातील तिसऱ्या नंबरच्या शिखरामध्ये सर्वात उंच शिखर म्हणून गणले जाते.

आता या ठिकाणी वन विभागाने संपूर्ण दोन्ही गडावरती लोखंडी रेलिंग बसविलेले आहे. किल्ल्यावर गुहेमध्ये भैरवगडाची मंदिर आहे, गडावर पाणी असून निवाऱ्यासाठी गुहा आहेत. गडावरून कळसूबाई रांग तसेच हरिचंद्र गड, कलाड गड, कुंजीर गड तर घनचक्कर वरून कळसुबाई रतनगडाचा खुंटा, आजोबागड तसेच भंडारदरा धरणाचे बॅक वॉटर असा नयनरम्य परिसर दिसतो.

फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबमधील शाहीर जयसिंग कांबळे यांनी घनगड या प्रांगणामध्ये अतिशय सुंदर असा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर पोवाड्याचे सादरीकरण केले. सर्वांच्या अंगावर वीरश्रीचे रोमान्स उभे केले. तसेच तुकाराम बीजनिमित्त श्री वाघ यांनी तुकारामाचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे भजन अतिशय छान गायिले.

फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब स्थापन करताना लहान मुलांना टीव्ही मोबाईल व कॉम्प्युटर यांच्या विळख्यातून दूर ठेवून, लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गड किल्ल्यांची पहाणी व गड किल्ले स्वच्छ ठेवून त्यांचे पवित्र राखणे तसेच निसर्गाची आवड निर्माण व्हावी. तसेच त्यांची शारीरिक, मानसिक, व बौद्धिक वाढ व्हावी तसेच ना नफा ना तोटा या उद्देशाने हा ट्रेकिंग क्लबची स्थापना झालेली आहे.

रविवारी रात्री 11 वाजता घरी सर्वजण सुखरूप पोहचले. फ्रेंड्स ट्रेकिंग क्लबचे शाहीर जयसिंग कांबळे, कालिदास सूर्यवंशी, सुहास आढाव, रमेश ससाने, रावसाहेब कडूस, देविदास गिरमे, शिवाजी नाईकरे, पुंजाजी तळेले, धैर्यशील दगडे, शशिकांत कुलकर्णी, पांडुरंग खटावकर, संजय दुर्वे तसेच महिलांमध्ये संगीता कुलकर्णी, डॉ. लता ससाने, डॉ. राखी बांगर, संगीता आरगडे, जयश्री पाखरे, अंजली खटावकर, शोभा गुंजाळ, प्रणाली नेवे, दिपाली डफळ, महानंदा बर्गे यांनी मोलाची मदत केली.