Tag: Pimpri Chinchwad

या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून
क्राईम

या कारणासाठी केला मित्राचा गोळ्या झाडून खून

पिंपरी चिंचवड : चिखली मध्ये एका मित्राने त्याच्या साथीदारासोबत मिळून मित्राला गोळ्या घालून ठार मारले. ही घटना सोमवारी (दि. 22) दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास घडली. या खुनाचे कारण अगदी क्षुल्लक आहे. मित्राची प्रतिष्ठा वाढू लागल्याने हा खून झाल्याचे समोर आले आहे. कृष्णा उर्फ सोन्या हरिभाऊ तापकीर (वय 21, रा. महादेवनगर, चिखलीगाव) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे मामा राजेंद्र कैलास कार्ले (वय 38, रा. चांदूस, ता. खेड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ उर्फ सोन्या पानसरे, सिद्धार्थ कांबळे (दोघे रा. फलकेवस्ती, मोईगाव, ता. खेड) आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी नवरात्रीच्या उत्सवात विकास साने यांनी पाटीलनगर चिखली येथील मैदानावर दांडिया कार्यक्रम आयोजित केला होता....
रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (अ) वाहतुक आघाडी संलग्न कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे भव्य उद्घाटन
पिंपरी चिंचवड

रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया (अ) वाहतुक आघाडी संलग्न कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे भव्य उद्घाटन

पिंपरी, दि.१७ (लोकमराठी) - पिंपरी शहरातील अजमेरा, मासुळकर कॉलनी येथील आय हॉस्पिटल समोर कै. माता हिराबाई किसनराव लांडगे रिक्षा स्टॅन्ड चे उद्घाटन आज महाराष्ट्र अध्यक्ष दक्षिण भारतीय बीजेपी मा. श्री राजेश आण्णा पिल्ले यांचे शुभहस्ते मोठ्या थाटामाटात करण्यात आले. चांगली सुविधा ह्या स्टॕडमुळे येणाऱ्या पेशंट व लोकांना मिळणार आहे. सुमारे रोज १० रिक्षा ह्या स्टॕडवर उभ्या असतील व वेळेत लोकांना रिक्षा वापर करता येईल. भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मातोश्री कै. माता हिराबाई किसन लांडगे यांच्या नावाने हा रिक्षा स्टॕड सुरू करण्यात आले आहे. राजेशजी पिल्ले यांनी आपल्या भाषणात भविष्यकाळात रिक्षाचालकांच्या ज्या काही समस्या, अडचणी, व्यावसायिक मागण्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस साहेबांच्या माध्यमातून पूर...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला पिंपळे सौदागरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाला पिंपळे सौदागरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन पिंपरी, दि. ३० : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केलं. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित होणाऱ्या मन की बात कार्यक्रमाचा आजचा शंभरावा भाग होता. त्यानिमित्त पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथे भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिंचवड विधानसभा अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे (Kunda Bhise) यांच्या जनसंपर्क कार्यालयात लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले. या कार्यक्रमाला रहिवाशांसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({}); हा कार्यक्रम रेडिओवर तसेच पीएम मोदींच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि यूट्यूबवर लाईव्ह प्रसारित करण्यात आला....
रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप
पुणे

रमजान ईद निमित्त प्रमुखमान्यवरांच्या शुभहस्ते शिलाई मशीनचे वाटप

पुणे, दि.२८ (लोकमराठी) - हातावर पोट असणाऱ्या अनेक महिलांना मजुरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यातील अनेकींना घरगुती स्वरूपाचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. मात्र, भांडवलाअभावी अनेकांचे स्वप्न हे अपूर्णच राहते.नेमकी हीच गरज ओळखून रमजान ईद निमित्त शेर-ए-अली सोशल फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले) गटाच्या वतिने गुरूवारी दि.२७ रोजी आर्थिकदृष्ट्या गरीब महिलांना शिलाई मशिनचे मोफत वाटप केले. व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्मा वाटप तसेच जेवनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वडगावशेरीतील शिवराज शाळेजवळ सोमनाथ नगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपण आता स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो, या जाणीवेने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे आणि कृतज्ञतेचे हसू फुलले. गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीन व लहान मुलांना खाऊ वाटप व शिरखुर्माचे वाटप मह...
पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण
पिंपरी चिंचवड

पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये रमजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण

पिंपरी, दि.२२ (लोकमराठी) - एक महिन्याच्या उपवासानंतर आज ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. पिंपरी शहरातील नेहरुनगरमधील ईदगा मैदान मध्ये हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत सामुहिक नमाज अदा केली. मौलाना यांनी ईदची नमाज सर्वांना पढवली ईद निमित्त पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समस्त समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्‍या. नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्ध आणि समाजबांधवांनी मैदान गर्दीने फुलून गेला होता. रिपब्लिक पार्टी अॉफ इंडीया (अ) वाहतुक आघाडी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजीजभाई शेख म्हटले, ए.बी शेख साहेब यांनी नेहरुनगर कब्रस्थानाला योगदान देऊन. ए.बी शेख साहेब यांच्या हाताने कब्रस्थान उभारण्यात आले.आज ते आमच्या मधी नाहीत त्यांची आठवण म्हणून कब्रस्थानाला काहिच कमी पडू देणार नाही. असे आवाहन त्यांनी के...
रामजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण
पुणे

रामजान ईद निमित्त सामुहिक नमाज पठण

पुणे दि.२२ (लोकमराठी) - एक महिन्याच्या उपवासानंतर आज ईद अल फितर म्हणजेच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.कोंढापुरी जामा मशिद येथे पोलिस निरीक्षक खटावकर साहेब, पोलिस हवालदार मंगेश लांडगे, सरपंच स्वप्नील गायकवाड, सरपंच संदीप डोमाले सर्वजण एकत्र येत शांततेत नमाज पठण केल. समस्त समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छा दिल्‍या. यावेळी पोलीस पाटील राजेश गायकवाड,उपसरपंच सुनील तात्या गायकवाड, उपसरपंच गणेश गायकवाड, चेअरमन शांताराम गायकवाड, अमोल गायकवाड, बापू गायकवाड ...
आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे

आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे, दि.२१ (लोकमराठी) - आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चैन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. राजा कल्याण सुंदराम (रा. पावेदसराई मासई नगर, तांबरम चेन्नई), रविंद्रम गोपीनाथम (रा. नॉर्थ पोलिस क्वॉर्टर, वेल्लूर), यादवराज शक्तीवेल (रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम, चेन्नई) आणि आर सुधाकरण (रा. वेंडलूरू, कांचीपुरम चेन्नई) असे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; मागील चार महिन्यात शिरूर शहरातून स्विफ्ट आणि डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते. अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात, फक्त स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले. पुणे ग्राम...
डॉ. अमरसिंह निकम यांना डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार
पिंपरी चिंचवड

डॉ. अमरसिंह निकम यांना डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार

माईसन, जर्मनी : डॉ. अँड्रियास एच. जंग यांच्या हस्ते डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्कार स्विकारला डॉ. डॉ. अमरसिंह निकम. पिंपरी : पिंपरीगाव येथील डॉ. अमरसिंह निकम यांना आय. एच. झेड. टी. या संस्थेच्या वतीने डॉ. हॅनिमन आंतरराष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. सॅम्युअल हॅनिमन यांच्या २६८ व्या जन्मदिनानिमित्त जर्मनीतील त्यांच्या मूळ जन्मस्थळी माईसन येथे नुकताच हा सोहळा पार पडला. त्यावेळी सुधा अमरसिंह निकम आणि युरोप मधील बहुसंख्य होमिओपॅथिक तज्ञ उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. मनिष निकम, डॉ. मनस्वी म. निकम आणि डॉ. सतीश म्हस्के यांनी होमिओपॅथीच्या शोधनिबंधावर आपले व्याख्यान दिले. डॉ. अमरसिंह निकम हे गेली चाळीस वर्ष होमिओपॅथीद्वारे रुग्ण सेवा देत आहेत. होमिओपॅथीमध्ये संशोधन करून होमिओपॅथीमधील पहिले खाजगी १०० बेडचे हॉस्पिटल, आदित्य होमिओपॅथिक हॉस्पिटल या नावाने च...
पिंपरी येथील खराळवाडीमध्ये बांधवांसाठी रोजा-ए- इफ्तार पार्टीचे आयोजन
पिंपरी चिंचवड

पिंपरी येथील खराळवाडीमध्ये बांधवांसाठी रोजा-ए- इफ्तार पार्टीचे आयोजन

पिंपरी, दि.२१ (लोकमराठी) - महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया वाहतुक आघाडी यांच्या वतीने बुधवारी खराळवाडीतील जामा मस्जिद मध्ये मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टी आयोजन केले होते. रमजान महिन्याच्या उपवासा निमित्त फळ आहाराचा आस्वाद सर्वांनी येथे घेतला. पिंपरी-चिंचवड शहरात विविध धर्मातील नागरिक आपले सण, उत्सव साजरे करतात. व त्याचबरोबर विविध कार्यक्रमाचे ही ते आयोजन करत असतात. या सण, उत्सवात व कार्यक्रमांमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व जाती धर्माचे नागरिक कोणताही भेदभाव न करता त्यामध्ये सहभागी होत असतात. या इफ्तार पार्टी वेळी सिमाताई रामदास आठवले यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडिया(अ) वाहतुक आघाडीच्या वतीने अजीजभाई शेख यांनी केला. यावेळी सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी ...
आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे
पिंपरी चिंचवड

आकुर्डीतील कचरा संकलन केंद्र स्थलांतरित करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात : आ. आण्णा बनसोडे

पिंपरी : आकुर्डी प्राधिकरण येथील निवासी भागातील कचरा संकलन केंद्र इतरत्र स्थलांतरित करावे. पिंपरी भाजी मंडई गाळेधारकांचे प्रलंबित प्रश्न, प्राधिकरण एलआयसी कॉलनीतील नागरिकांच्या अडचणी व भटक्या प्राण्यांबाबत उपाय योजना आदी विषयांवर आयुक्त शेखर सिंह यांनी ताबडतोब लक्ष द्यावे आणि निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी आमदार आण्णा बनसोडे यांनी शुक्रवारी केली. शुक्रवारी पिंपरी चिंचवड मनपा भवन येथे आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात आ. आण्णा बनसोडे यांनी आयुक्त आणि प्रशासनातील अधिकारी यांच्या समवेत बैठक घेतली. माजी महापौर आर. एस. कुमार, माजी उपमहापौर राजू मिसाळ, शैलेजा मोरे, डब्बु आसवाणी, माजी नगरसेवक अमित गावडे, प्रसाद शेट्टी तसेच अनुप मोरे, सिद्धार्थ अण्णा बनसोडे, सतीश लांडगे, प्रतीक इंगळे व प्राधिकरण परिसर व मतदार संघातील नागरिक उपस्थित होते. आकुर्डी प्राधिकरणातील कचरा संकलन के...