Tag: MM Polytechnic

एम.एम. तंत्रनिकेतनच्या सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र
शैक्षणिक

एम.एम. तंत्रनिकेतनच्या सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र

पिंपरी चिंचवड : येथील एम.एम तंत्रनिकेतनच्या संगणक विभागातील सहा शैक्षणिक प्रकल्पना कॉपी राईटचे प्रमाणपत्र देण्यात आले. बाह्यपरीक्षका समोर ३८ प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. त्यातील सात प्रकल्प कॉपी राईट प्रमाणपत्रासाठी पाठवण्यात आली, त्यातील सहा प्रकल्पाना प्रमाणपत्रे मिळाले असून एक प्रकल्प मंजूर झाला असून प्रमाणपत्र यायचे बाकी आहे अशी माहिती संगणक विभागाचे प्रमुख विकास सोळंके यांनी दिली. नाविन्यपूर्ण संशोधनाचा ध्यास घेतलेल्या एम.एम तंत्रनिकेतनमध्ये शैक्षणिक प्रकल्प निवडताना दररोज भेसवणाऱ्या अडचणींना तंत्रज्ञनाच्या माध्यमातून कश्या सोडवता येतील या वर भर दिला जातो. अश्या सर्व प्रकल्पना संशोधकीय नियतकालिकात प्रकाशित केले जाते. मागील वर्षी ३२ प्रकल्प नियतकालिकात प्रकाशित झाले यात ६५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गुणवत्तापूर्ण शिक्षण, तंत्रज्ञनाचा योग...
पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज
शैक्षणिक, पिंपरी चिंचवड

पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु | दहावीच्या गुणपत्रिकेशिवाय भरता येणार प्रवेश अर्ज

पिंपरी चिंचवड : काळेवाडीतील मराठवाडा मित्र मंडळाचे पॉलिटेक्निक येथे शैक्षणिक सत्र 2021-22 करिता प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका प्रवेशसाठी सुविधा केंद्र (FC 6449) कार्यान्वित करण्यात आले आहे. पॉलिटेक्निकला प्रवेश अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांना आता दहावीच्या गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही. प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया दि. 30 जून 2021 पासून संस्थेत सुरुवात करण्यात आली आहे. पॉलीटेक्नीकच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छीणाऱ्या इयत्ता दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी संस्थेत कार्यान्वित करण्यात आलेल्या सुविधा केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे प्राचार्या गीता जोशी यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्याकरिता केवळ दहावीच्या परीक्षेचा आसन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. वर्ष 2021 च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल घोषित झाल्यानंतर सद...