पिंपळे सौदागर : उन्नती सोशल फाउंडेशनच्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपळे सौदागर : मोफत महाआरोग्य शिबिरात सहभागी झालेले नागरिक. त्यावेळी उपस्थित कुंदा भिसे व संजय भिसे.
पिंपळे सौदागर : उन्नति सोशल फाऊंडेशन व डॉ. ओंकार बाबेल ब्रहमचैतन्य आयुर्वेद क्लिनीक यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत महाआरोग्य आयुर्वेदीक तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन रविवारी येथे करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरात बधिरपणा, हाता पायाला मुंग्या येणे, संधीवात, पोटाचे आजार, मणक्यांचे आजार, दमा, अस्थमा, मुळव्याध, त्वचाविकार, स्त्रियांचे आजार, अम्लपित्त, डोके दुखी, अर्धशिशी (माईग्रेन), सर्दी व खोकला, वारंवार शिंका येणे आदी आजारांची तपासणी व उपचार करण्यात आले.
त्याप्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, उद्योजक संजय भिसे, डॉ. सुभाषचंद्र पवार, विलास जोशी, अनिल कुलकर्णी, सतिश पिंगळे, विवेकानंद लीगाडे, सुरेश कुंजीर, सागर बिरारी, सुभाष पाटी...