पिंपळे सौदागरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पिंपळे सौदागरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
  • उन्नती सोशल फाऊंडेशन आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपळे सौदागर : येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने व कृष्णा क्लासिकल होमिओपॅथी व सह्यांद्री स्पेशालिटी लॅब यांचा सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य आणि कोलेस्टेरॉल व शुगर तपासणी शिबीर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिबिराचे आयोजक व उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, भानुदास काटे पाटील, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल, विकास काटे, शंकरराव पाटील, रमेश वाणी, सुभाषचन्द्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

पिंपळे सौदागरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कृष्णा क्लासिकल होमिओपॅथी क्लीनिकचे होमिओपॅथी तज्ञ डॉ. विवेक माळी व डॉ. स्वाती माळी यांच्या सहयोगाने हे शिबीर यशस्वी झाले. परिसरातील शेकडो तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

उद्घाटनप्रसंगी चंद्रकांत महाराज वांजळे यांनी उन्नती फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, “संजय भिसे आणि कुंदाताई भिसे हे वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व सामाजिक क्षेत्रात वावरत असताना संतमहात्म्यांचे विचार सातत्याने आचरणात आणतात. याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात भिसे दाम्पत्यांच्या प्रगतीचा आणि यशाचा आलेख उत्तरोत्तर वाढत जावो, अशी पांडुरंगा चरणी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.”

याप्रसंगी बोलताना फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे म्हणाल्या की,” देशावर ओमिक्रोन व्हायरस संक्रमणाचा धोका उदभवत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशावेळी किमान आपले प्राथमिक आरोग्य निरोगी राहणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही या शिबिराचे आयोजन केले असून यापुढेही अशाप्रकारे शिबीर आम्ही सातत्याने भरवू.” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.