Tag: Pimple Saudagar

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले
पिंपरी चिंचवड, सामाजिक

उन्नती सोशल फाउंडेशनच्या अनोख्या सहलीमुळे त्या पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उमगले

दिव्यांगांच्या उन्नतीसाठी उन्नती सोशल फाउंडेशन सदैव प्रयत्नशील - डॉ. कुंदाताई भिसे पिंपरी (दि. १२ ऑगस्ट २०२३) : स्व. राहुल शामराव जोशी यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू ओंकार जोशी आणि पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंजनवेल कृषी पर्यटन केंद्र येथे विशेष (दिव्यांग) मुलांच्या माता आणि भगिनींसाठी नुकतेच विनामूल्य एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीस पालकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत मोठ्या संख्यने विशेष मुलांच्या माता आणि भगिनींनी संपूर्ण दिवस निसर्गाच्या सानिध्यात, प्रदूषणमुक्त वातावरणात आणि आनंदात घालवला. तसेच तसेच चविष्ट व सात्विक भोजनाचा आस्वाद घेत एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण केली. यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कुंदाताई भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, ओंकार जोशी, अंजनवेल कृषी पर्यटनचे राहुल जगताप...
‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण
पिंपरी चिंचवड, राजकारण

‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण

चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे यांचा उपक्रम देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधान मोदींचा व्हर्च्युअल संवाद पिंपरी (दि. २७) : केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज मंगळवारी (दि. २७) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेरा बूथ, सबसे मजबूत' मोदी @ ९ या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संघटनात्मक मंडळे आणि बूथवर देशभरातील सुमारे दहा लाख भाजप कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधत त्यांना संबोधित केले. भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शहर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्य...
उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनची स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात 
पिंपरी चिंचवड

उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनची स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात

''आम्ही विठ्ठलाचे वारकरी'' च्या गजरात अख्ये पिंपळे सौदागर न्हाऊन निघाले सोसायटी वर्गाच्या भरगच्च उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली... पिंपरी (प्रतिनिधी) : '' आम्ही विठ्ठलाचे वारकरी, दिन गेले भजनाविना सारे '' या गजरात अख्ये पिंपळे सौदागर न्हाऊन निघाले. उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आयोजित '' स्वरामृत दिवाळी पहाट '' ही आनंद, उत्साह अन् जल्लोष सर्वत्र नावीन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई, संपन्नतेचे प्रतीक घेऊन आली. पिंपळे सौदागरवासियांच्या उपस्थितीत आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायकांच्या स्वरसुरांनी दीपोत्सवाचे आगमन झाले. त्यांच्या गायनात रसिक श्रोते अक्षरक्ष: भारावून गेले. एका पेक्षा एक सरस अशी भक्ती आणि भावगीत सादर करून सा रे ग म प लिटल चॅम्प्स उपविजेता सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, सुप्रसिद्ध...
उन्नती फाऊंडेशन ही सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ – अश्विनीताई लक्ष्मण जगताप
पिंपरी चिंचवड

उन्नती फाऊंडेशन ही सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ – अश्विनीताई लक्ष्मण जगताप

उन्नती सोशल फाउंडेशनच्या "बेस्ट दांडिया ग्रुप डान्स स्पर्धेची" पिंपळे सौदागरमध्ये धूम युवक-युवतींचा लक्षणीय सहभाग, स्पर्धकांवर बक्षिसांची बरसात पिंपळे सौदागर, (प्रतिनिधी) : आपल्या सर्वांवर कोरोनाचे संकट आले तेव्हा उन्नती सोशल फाऊंडेशनची (Unnati Social Foundation) टीम नागरिकांची काळजी घेण्यात व्यस्त होती. जीवघेण्या महामारीत स्वतःच्या जीवाची परवा न करता उन्नतीच्या टीमने नागरिकांच्या दारात जाऊन अन्नपुरवठ्यापासून ते रुग्णालयात बेड उपलब्ध करेपर्यंत कष्ट घेतले. माझ्या प्रभागातील एकाही नागरिकाच्या जीवाला धोका होऊ नये, या आकांक्षेने उन्नती सोशल फाऊंडशन लढत राहिले. ते आपल्या कार्यात यशस्वी झाले असून त्यांच्यामुळेच आपल्याला आज दांडियाचा मनसोक्त आनंद घ्यायला मिळाला. त्यामुळे उन्नती हे केवळ फाऊंडेशन नसून ती सर्वधर्म समभाव जपणारी सामाजिक चळवळ आहे, असा विश्वास अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांनी व...
निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र – कुंदा भिसे
पिंपरी चिंचवड

निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र – कुंदा भिसे

पिंपळे सौदागरमध्ये 'होम फिट इंडिया' जीमच्या उद्घाटनप्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे प्रतिपादन पिंपरी : आजच्या धकाधकीच्या युगात मनुष्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच आज सुखी जीवनाचा मुलमंत्र आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पिंपळे सौदागर येथे 'होम फिट इंडिया' या जीमचे उद्घाटन करण्यात आले आहे. असे प्रतिपादन (Unnati Social Foundation) उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे (Kunda Sanjay Bhise) यांनी केले. उन्नतिच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते नुकतेच या जीमचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक व यशदा रिएलिटी ग्रुपचे व्हॉईस चेअरमन संजय भिसे, सागर बिरारी, मयूर काळे, अशोक शालगर, मोनाली कुलकर्णी शालगर, रुपाली लोखंडे, चंचल अरबाळे, पंडित नरवाडे, शंकर चव्हाण, गणेश श...
विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली
पिंपरी चिंचवड, सामाजिक

विशेष सहयोग शिबिरांतर्गत दिव्यांग मुलांसाठी विविध सुविधा एकाच छताखाली

उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन पिंपरी : जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उन्नती सोशल फाउंडेशन व सप्तर्षी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांसाठी विशेष सहयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत अनेक सवलती आणि शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आले होते. पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या कार्यालयात रविवारी (दि. १२ डिसेंबर) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबीर संपन्न झाले. या शिबिरात वय वर्ष ६ ते १८ वयोगटातील शेकडो दिव्यांग मुलांनी सहभागी होत या शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सप्तर्षी फाउंडेशनचे सहसचिव मनोजकुमार बोरसे, ऋषाली बोरसे, विशाल पवार, विशाल घंदुरे, नंदकिशोर आहेर, समीना काझी, मच्छिन्द्र वीर, किरण ...
रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

रोझ आयकॉन सोसायटीत कंम्पोस्टिंग प्रक्रिया प्लांटचे उद्घाटन

पिंपळे सौदागरमधील सर्व सोसायट्यांमध्ये कंपोस्ट प्रकल्प राबविण्याचा कुंदा भिसे यांचा संकल्प पिंपरी चिंचवड : झाडांचा जमिनीवर गळालेला पालापाचोळा, शेणखत आणि चहापत्ती यावर प्रक्रिया करून तयार होणाऱ्या कंपोस्ट खताच्या दुसऱ्या प्लांटचे पिंपळे सौदागरमधील रोझ आयकॉन सोसायटीत आज उद्घाटन करण्यात आले. उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी सदर प्लांटला भेट देऊन या प्लांटविषयी माहिती घेतली. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, रोझ आयकॉन सोसायटीचे चेअरमन रवी मुंढे, पंकज देशमुख, गौरव पाटील, संतोष कवडे, प्रसाद पाखरे, मोहित आगरवाल, शशिकांत शर्मा, विकास काटे, दिनेश काटे आदी मान्यवर उपस्थित होते. या कंपोस्ट प्रकल्प प्लांटमध्ये झाडांचा पाळापाचोळा, शेणखत, चहापत्ती या नैसर्गिक गोष्टींचेच मिश्रण करून खत तयार केले जाते. याला शासनाचा टेस्टिंग रिपोर्ट देखील मिळाला आहे. हे खत सोसा...
पिंपळे सौदागरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
पिंपरी चिंचवड

पिंपळे सौदागरमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

उन्नती सोशल फाऊंडेशन आयोजित शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पिंपळे सौदागर : येथील उन्नती सोशल फाऊंडेशनच्या वतीने व कृष्णा क्लासिकल होमिओपॅथी व सह्यांद्री स्पेशालिटी लॅब यांचा सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य आणि कोलेस्टेरॉल व शुगर तपासणी शिबीर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडले. या शिबिराचे उद्घाटन चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिबिराचे आयोजक व उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे, सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे, भानुदास काटे पाटील, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल, विकास काटे, शंकरराव पाटील, रमेश वाणी, सुभाषचन्द्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कृष्णा क्लासिकल होमिओपॅथी क्लीनिकचे होमिओपॅथी तज्ञ डॉ. विवेक माळी व डॉ. स्वाती माळी यांच्या सहयोगाने हे शिबीर यशस्वी झाले. परिसरातील शेकडो तरुण ...
‘आपला प्रभाग-कचरामुक्त प्रभाग’; पिंपळे सौदागरवासीयांचा संकल्प!
पिंपरी चिंचवड, सामाजिक

‘आपला प्रभाग-कचरामुक्त प्रभाग’; पिंपळे सौदागरवासीयांचा संकल्प!

नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने 'प्लॉगेथॉन-२०२१' मोहिम यशस्वी पिंपळे सौदागर : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात राबविण्यात आलेल्या 'प्लॉगेथॉन' अभियानाला पिंपळे सौदागर प्रभागात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 'आपला प्रभाग, कचरामुक्त प्रभाग' असा संकल्पच या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी हाती घेतला आहे. आज सकाळी सात ते दहा या वेळेत हे अभियान संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात राबविले गेले. या अभियानांतर्गत पिंपळे सौदागर येथील कोकणे चौक ते रॉयल सोसायटी रस्ता आणि दत्त मंदिर ते स्वराज चौक मार्गावर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त राजेश पाटील, उपआयुक्त विकास ढाकणे, उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेवक नाना काटे, भूषण पाटील, नगरसेविका निर्मला कुटे, राजेंद्रनाथ जयस्वाल, लायन्स क्लबचे अंजुम सय्य...
पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन
पिंपरी चिंचवड, सामाजिक

पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन

पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने आणि उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात येते. या शिबिरात मागील २० लाभार्थी आणि नवीन ५० लाभार्थी, असे एकूण ७० लाभार्थ्यांची तपासणी होणार असून हि संख्या उत्तरोत्तर वाढविण्यात येणार आहे. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेऊन विशेष मुलांसाठी होमिओपॅथी उपचार पद्धत विकसित केली आहे. त्यांनी आजवर लाखो मुलांना निस्वार्थपणे मोफत उपचार दिले आहेत. सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी हि संस्था गेली अनेक वर्षे दिव्यांग मुलांच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम करीत आहे. आजपर्यंत “सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा केंद्रातू...