पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन

पिंपळे सौदागरमध्ये दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीराचे आयोजन

पिंपरी : सप्तर्षी फाउंडेशन व प्रेडिक्टिव होमिओपॅथी यांच्या वतीने आणि उन्नती सोशल फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्याने दिव्यांग मुलांसाठी विशेष होमिओपॅथी उपचार शिबीर गुरूवारी (ता. २१) आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबीर कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात येते.

या शिबिरात मागील २० लाभार्थी आणि नवीन ५० लाभार्थी, असे एकूण ७० लाभार्थ्यांची तपासणी होणार असून हि संख्या उत्तरोत्तर वाढविण्यात येणार आहे. कै. डॉ. प्रफुल्ल विजयकर सर यांनी दिव्यांग मुलांच्या कल्याणासाठी अथक परिश्रम घेऊन विशेष मुलांसाठी होमिओपॅथी उपचार पद्धत विकसित केली आहे. त्यांनी आजवर लाखो मुलांना निस्वार्थपणे मोफत उपचार दिले आहेत.

सप्तर्षी फाउंडेशन, रहाटणी हि संस्था गेली अनेक वर्षे दिव्यांग मुलांच्या विकासासाठी निस्वार्थ भावनेने काम करीत आहे. आजपर्यंत “सप्तर्षी समग्र दिव्यांग सेवा केंद्रातून हजारो दिव्यांगाना सहयोग दिला आहे. तसेच यापुढेही असेच नाविन्यपूर्ण समाजउपयोगी उपक्रम करण्याचा संस्थेचा मानस आहे.

सदर कार्यक्रमासाठी उन्नती सोशल फाउंडेशनचे विशेष सहकार्य प्राप्त झाले असून, आयोजनाची मुख्य जबाबदारी उचलली आहे.

कार्यक्रमाची रूपरेषा व नियमावली

  • सकाळी ९.०० वाजता : उद्घाटन
  • सकाळी ९.३० ते ११.०० मागील शिबिरार्थींचे फॉलोअप तपासणी (२० पेशंट)
  • सकाळी ११.०० ते दु. २.०० नवीन केसेस – केस टेकिंग, समुपदेशन, औषध वाटप
  • दु. २.०० ते २.३० डॉक्टर आणि स्वयंसेवकांसाठी भोजन
  • दु. २.३० ते सायं. ७.३० : नवीन केसेस – केस टेकिंग, समुपदेशन, औषध वाटप
  • सायं. ७.३० : कार्यक्रमाचा समारोप

नियमावली

  • सदर शिबिरासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून २१ ऑक्टोबर च्या शिबिरासाठीची नोंदणी पूर्ण झाली आहे.
  • दिव्यांग मुलांसाठी वयोमर्यादा : १ वर्ष ते २५ वर्षे
  • नोंदणीकृत दिव्यांग व्यक्तीलाच प्रवेश दिला जाईल. तसेच नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना कोविड नियमांचे पालन करावयाचे असून आयोजकांनी गर्दी न होण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांना निश्चित वेळ दिलेली आहे, त्याच वेळेत लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे.
कार्यक्रमाचे स्थळ : उन्नती सोशल फाउंडेशन, पी के इंटरनॅशनल स्कूल समोर, कोटक महिंद्रा बँकेशेजारी, पिंपळे सौदागर, पुणे-२७