‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण

'मेरा बूथ, सबसे मजबूत' मोदी @ ९ कार्यक्रमाचे पिंपळे सौदागरमध्ये थेट प्रक्षेपण
  • चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदाताई भिसे यांचा उपक्रम
  • देशभरातील भाजप कार्यकर्त्यांशी पंतप्रधान मोदींचा व्हर्च्युअल संवाद

पिंपरी (दि. २७) : केंद्रातील भाजप सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज मंगळवारी (दि. २७) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ मोदी @ ९ या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संघटनात्मक मंडळे आणि बूथवर देशभरातील सुमारे दहा लाख भाजप कार्यकर्त्यांशी व्हर्च्युअल संवाद साधत त्यांना संबोधित केले.

भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या आमदार आश्विनी लक्ष्मण जगताप आणि भाजपा प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य शंकरशेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर भाजपच्या चिंचवड विधानसभेच्या महिला मोर्चा अध्यक्षा डॉ. कुंदा भिसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शहर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रमाच्या थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती.

यावेळी संजय भिसे, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेवक बाबा त्रिभुवन, नरेश खुळे, हर्षल नढे, भूषण शिरोडे, विनोद तापकीर, काळूराम नढे, रमेश काळे, उपाध्यक्ष पिंचिं भाजपा धर्मा पवार, सरचिटणीस ओबीसी मोर्चा पिंचिं कैलास सानप, सागर बिरारी, चंदन कुंजीर, राजेंद्र जयस्वाल, आदेश काटे, विजय भांगरे, सुप्रिया पाटील, प्रकाश लोहार, भाजपा ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख उत्तर महाराष्ट्र मनोज ब्राह्मणकर, विलास जोशी डॉ. सुभाषचंद्र पवार, पिंगळे, लिगाडे, अनिल कुलकर्णी, अशोक मटालिया, शरा कीर्तिकुमार, हितेश कक्कड, राजेंद्र देशमुख, जयश्री चौधरी, शकुंतला शिंदे, सखाराम ढाकणे, विजय रोकडे, देवराव वैद्य, अशोक वारकर, ममता बॅनर्जी, भक्ती लवेकर, योगिता नाशिककर, शुभांगी केडूस्कर, सुवर्णा दातकर, स्वाती सोनवणे, प्रा. धनश्री सोनवणे, कल्पना बागुल आदी मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, ‘मेरा बूथ, सबसे मजबूत’ हा कार्यक्रम आमच्या कष्टकरी कार्यकर्त्यांच्या राष्ट्र उभारणीच्या संकल्पाला नवी ऊर्जा देईल. जागरूक मतदार हा लोकशाहीचा आधार असून लोकशाहीत मतदार असणे ही अभिमानाची बाब आहे. या सगळ्यात महत्त्वाचं युनिट म्हणजे ‘व्होटिंग बूथ’. तुम्ही भाजपची सर्वात मोठी ताकद आहात. एवढा मोठा कार्यक्रम कोणत्याही राजकीय पक्षाने आयोजित केला नसता. इतिहासात प्रथमच बुथ नेत्यांची परिषद झाली. तुम्ही फक्त भाजपचेच नाही तर देशाच्या समृद्धीचे खंबीर सैनिक आहात. पक्षापेक्षा देश मोठा आहे. अशा कष्टकरी कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे एक सौभाग्य आहे.