निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र – कुंदा भिसे

निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र - कुंदा भिसे
  • पिंपळे सौदागरमध्ये ‘होम फिट इंडिया’ जीमच्या उद्घाटनप्रसंगी उन्नती फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांचे प्रतिपादन

पिंपरी : आजच्या धकाधकीच्या युगात मनुष्याचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच आज सुखी जीवनाचा मुलमंत्र आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पिंपळे सौदागर येथे ‘होम फिट इंडिया’ या जीमचे उद्घाटन करण्यात आले आहे. असे प्रतिपादन (Unnati Social Foundation) उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा संजय भिसे (Kunda Sanjay Bhise) यांनी केले.

उन्नतिच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते नुकतेच या जीमचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक व यशदा रिएलिटी ग्रुपचे व्हॉईस चेअरमन संजय भिसे, सागर बिरारी, मयूर काळे, अशोक शालगर, मोनाली कुलकर्णी शालगर, रुपाली लोखंडे, चंचल अरबाळे, पंडित नरवाडे, शंकर चव्हाण, गणेश शालगर, प्रियांका शालगर, प्रणव चव्हाण, विराट शाह, निखिल शाह, अजित चौघुले, गौरव सुतार, दिलीप जाजू, पवन सरनाईक, प्रताप कव्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र - कुंदा भिसे

पिंपळे सौदागरमध्ये प्रथमच अशी सोय

‘होम फिट इंडिया’ या जिममध्ये अनेक अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असे उपकरणे आहेत. तसेच अनुभवी तज्ञ ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली येथे व्यायामाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर योग्य आहार प्लॅनही देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षणची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. व्यायामासाठी लागणारे उपकरणे हे भाडे तत्त्वावर आपण घेऊन घरीच जिम तयार करू शकतो. विशेतः पिंपळे सौदागर मधील हि प्रथमच अशी सोय उपलब्ध करून देणारे ठिकाण असेल.

यावेळी कुंदा भिसे म्हणाल्या की, “मागील काही वर्षात नवनवीन आजारांनी थैमान घातले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनुष्याच्या जीवनात आरोग्य आणि व्यायामाचे महत्व अधोरेखित झाले आहे. या आजारांना दूर ठेवण्यासाठी व त्यांच्याशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज असून ती काळाची गरज आहे. ही गरज ओळखून ‘होम फिट इंडिया’च्या मदतीने आपली वाटचाल सुरु करावी.”

निरोगी व तंदुरुस्त शरीर हाच सुखी जीवनाचा मुलमंत्र - कुंदा भिसे