एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेचे एस. एम .जोशी कॉलेजमध्ये पद्मविभूषण शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, महाविद्यालयातील हेल्थ सेंटर, नोबेल हॉस्पिटल ब्लड बँक व आपका डाॅक्टर फाउंडेशन यांच्या वतीने भव्य रक्तदान घेण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ७२ विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये ६६ विद्यार्थी व ८ विद्यार्थिनींनी रक्तदान केले. महाविद्यालयात शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते संपन्न झाले. या रक्तदान शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रकांत खिलारे यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉ. शंतनू जगदाळे, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रा. रमेश गावडे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डाॅ. रंजना जाधव, डॉ. दिनकर मुरकुटे, प्रा. ऋषिकेश खोडदे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. दत्ता वसावे व महाविद्यालयातील हेल्थ सेंटरचे प्रमुख डॉ.अशोक पांढरबळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सेवक, एन.सी. सी. व एन. एस. एस.चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी या रक्तदान शिबिरात यशस्वीरित्या सहभाग घेतला.