उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनची स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात

उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनची स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात 
  • ”आम्ही विठ्ठलाचे वारकरी” च्या गजरात अख्ये पिंपळे सौदागर न्हाऊन निघाले
  • सोसायटी वर्गाच्या भरगच्च उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली…

पिंपरी (प्रतिनिधी) : ” आम्ही विठ्ठलाचे वारकरी, दिन गेले भजनाविना सारे ” या गजरात अख्ये पिंपळे सौदागर न्हाऊन निघाले. उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन आयोजित ” स्वरामृत दिवाळी पहाट ” ही आनंद, उत्साह अन् जल्लोष सर्वत्र नावीन्याची चाहूल आणि सजावटीची नवलाई, संपन्नतेचे प्रतीक घेऊन आली. पिंपळे सौदागरवासियांच्या उपस्थितीत आपल्या सुरेल आणि जादुई आवाजाने लहान-थोरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या गायकांच्या स्वरसुरांनी दीपोत्सवाचे आगमन झाले.

त्यांच्या गायनात रसिक श्रोते अक्षरक्ष: भारावून गेले. एका पेक्षा एक सरस अशी भक्ती आणि भावगीत सादर करून सा रे ग म प लिटल चॅम्प्स उपविजेता सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, सुप्रसिद्ध गायक संगीतकार कल्याणजी गायकवाड, सा रे ग म प महाविजेती सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड, सुप्रसिद्ध पाश्र्व गायिका अनुराधा पटवर्धन यांनी रसिकांची प्रत्येक गाण्याला दाद मिळवली. तब्बल सात मिनिटे विठ्ठलाचा गजर सुरू राहिल्याने परिसराला प्रतिपंढरीचे स्वरूप आले होते.

उन्नती सोशल फाउंडेशन आणि शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनची स्वरामृत दिवाळी पहाट उत्साहात 

हा कार्यक्रम दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शनिवारी धनत्रयोदशीला (दि. २२) आणि रविवारी (दि. २३) रोजी पहाटे ५ वाजता गोविंद यशदा चौकातील लिनिअर गार्डनमध्ये सलग दोन दिवस उत्साहात पार पडला. यावेळी आयोजक उन्नती सोशल फाऊंडेशन आणि भारतीय जनता पार्टी, चिंचवड विधानसभा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई भिसे, मा. नगरसेवक शत्रुघ्न उर्फ बापू काटे, उद्योजक संजयशेठ भिसे, हभप पुरुषोत्तम महाराज पायगुडे, शेखर महाराज जांभूळकर, सुप्रसिद्ध मॉडेल अनुक्षा गाडेकर, सामाजिक कार्यकर्त्या शारदाताई मुंडे, पीके इंटरनेशनल स्कूल चे संस्थापक जगन्नाथ काटे ,उद्योजक वसंत काटे, जयनाथ काटे, विजय भिसे,भानुदास काटे, सुरेश कुंजीर, विलास काटे, विकास काटे, शशी काटे ,अतुल पाटील ,शाम कुंजीर,राजेंद्र जयस्वाल व जेष्ट नागरिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

आयोजक कुंदा भिसे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने पिंपळे सौदागरमध्ये संगीत दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात येत आहे. मागील दोन वर्षांत कोविड परिस्थितीमुळे कार्यक्रम होऊ शकला नाही. यंदा ” स्वरामृत दिवाळी पहाट ” या कार्यक्रमाचे गेली दोन दिवस आयोजन करण्यात आले. पिंपळे सौदागर परिसरातील सोसायटी वर्गाने या कार्यक्रमास हजेरी लावत शोभा वाढविली. यापुढेही असेच सांकृतिक कार्यक्रम राबविणार आहे.

शत्रुघ्न काटे म्हणाले, संगीताची जननी ही शास्त्रीय संगीत असून तिची जपवणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जसे मंदीर, गड किल्ले जोपासले जातात तसे शास्त्रीय संगीत जोपासले जावे. संगीत वेदऋचामधून आलेली भाषा आहे. रागाची बिजे शास्त्रीय संगीतात दडली असून, ही कला टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहावे.

” गजर वित्ठ्ठलाचा ” या या गीताने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाल प्रारंभ झाला. कैसे रिजावू अब मन को या राग भूपाल, त्यानंतर जगदंबी का अंबिका हे देवीवरील भक्तीगीत सादर केले. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी या अभंगाला रसिकांनी भरभरुन दाद दिली. त्यानंतर ठाई ठाई विठ्ठल, आम्ही विठ्ठलाचे वारकरी, दिन गेले भजनाविना सारे, सूरत पिया बिन छिन बिसराये, मन हे राम रंगी रंगले,झिनी रे झिनी चदरीया हे स्वरचित चीज प्रसुत केली. रसिकांच्या फर्माईश्वर त्यांनी हे सूरांनो चंद्र व्हा हे नाटयपदानंतर कानडा राजा पंढरीचा या भक्तीगीताने कार्यक्रमाची सांगता केली. या गाण्यातील शेवट विठ्ठलाच्या गजराने केला. यात रसिकांनीही तितकीच दाद देत विठ्ठलाचा तब्बल पाच सात मिनीटे नामघोष केला. जणू की येथे पंढरीच अवतरली असे वातावरण बनले.

स्वरामृत दिवाळी पहाट कार्यक्रमात सुप्रसिध्द गायक आणि गायिका यांना संगीत संयोजक गणेश गायकवाड, व्हायोलीन वादक अपुर्व गोखले, हार्मोनियम प्रविण कासलीकर, तबला किशोर कोरडे, पखवाज राजेंद्र बघे, बासरी निलेश बुंदे, निवेदक दयानंद घोटकर, पुजा थीगळे यांनी साथ केली. या कार्यक्रमात साथसंगत करणाऱ्यांना रोपटे भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. उद्योजक संजयशेठ भिसे व पिंपळे सौदागर मधील ग्रामस्थांनी आभार मानले.