डॉ. मनीषा गरूड यांना ‘डीडीआय आरोग्य सन्मान २०२१’ पुरस्कार प्रदान

डॉ. मनीषा गरूड यांना 'डीडीआय आरोग्य सन्मान २०२१' पुरस्कार प्रदान

पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : डी डी आय आरोग्य सन्मान हा राज्यस्तरीय जूरी आधारित अवॉर्ड समारोह नुकताच मुंबईील राजभवन येथे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांच्या हस्ते पार पडला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आयुर्वेद मॉडर्न मेडिसिन होमिओपॅथी दंतवैद्यक शास्त्र आणि परिचारिका विभाग ८० नोमिनीस मधून २० अंतिम निवडले गेले. प्रत्येक विभागातून चार जूरी नेमण्यात आले. त्यापैकी एकच महिला वूमन डेंटल कौन्सिलचा राष्ट्रीय सचिव डॉ. मनीषा गरुड यांची नेमणूक झाली होती.

दरम्यान, दंत विभागात चंद्रपूरचे डॉ. राजीव बोरले यांना जीवन गौरव पुरस्कार आणि ठाण्याचे डॉ. अनिश नवरे यांना रफीउद्दीन अहमद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डी डी आय चे पदाधिकारी डॉ.मनोज देशपांडे, डॉ. देवेंद्र हंबर्डेकर, डॉ. गिरीश कामत यांचेही आरोग्य सन्मान पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. राज्यपाल भगतसिंग कोशीयारी यांनी सगळ्या पुरस्कार विजेते जुरी यांचा सन्मान केला. तसेच आरोग्य सन्मानच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.