प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर
डॉ. धनाजी भिसे

पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. ही संशोधनपदवी जाहिर केली. त्याबाबतच्या खुल्या परीक्षेचे आयोजन विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि बहि:स्थ परीक्षक डॉ.सतीश बडवे (औरंगाबाद) ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.

त्याला ८२ हून अधिक व्यक्तींनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. डॉ. भिसे ह्यांनी पीएचडीसाठी डॉ. बाबासाहेब शेंडगे (रयत शिक्षण संस्थेचे एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘इ.स. २००० ते २०१० मधील दलित आत्मकथने : एक शोध’ ह्या शीर्षकाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता.

या खुल्या परिक्षेला माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी कुलगुरु एस. एन. पठाण, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ अविनाश सांगोलकर, प्राचर्य पांडुरंग गायकवाड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट मेंबर प्रा. डॉ. देवीदास वायदंडे, मराठी विभागाचे प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. राजाभाऊ भैलुमे, डॉ. सुभाष आहेर, डॉ. संजय मेस्त्री, डॉ. सोमनाथ दडस, डॉ. राजेंद्र बावळे, डॉ. मनोहर सुरवडे, डॉ. रविंद्र पगार, राजन लाखे, चंद्रकांत धस, डॉ. क्रांती गोसावी, प्रा. दीपक कांबळे, डॉ. संतोष पवार, डॉ. नंदकुमारल उदार, डॉ. विवेकानंद ससाणे, डॉ. मोरेश्वर नेरकर, डॉ. समिंदर घोक्षे, डॉ. रविंद्र शिंदे, भगवान पवार, संतोष ससाणे तसेच मराठी विभागाचे लिपीक सुनील जगताप, इत्यादी मान्यवर ऑनलाईन उपस्थित होते.

डॉ. धनाजी भिसे ह्यांच्या यशाबद्दल माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोतापल्ले माजी कुलगुरू डॉ. एस एम एस एन पठाण अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, प्राचार्य गुरुवर्य डॉ. अविनाश सांगोलेकर, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड शुभेच्छा व्यक्त केल्या.