Tag: Dr Dhananjay Bhise

मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर
पिंपरी चिंचवड

मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांना समाजरत्न पुरस्कार जाहिर

पिंपरी : साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे मानव विकास संस्था फुले पिंपळगांव (ता. माजलगांव जि. बीड) यांच्या वतीने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाजरत्न राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड पत्र मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. धनंजय भिसे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे मानव विकास संस्थाचे अध्यक्षा उषा गायकवाड व सचिव सुमंत गायकवाड यांनी पत्राद्वारे हे जाहिर केले आहे. शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रिडा पर्यावरण, साहित्य,सामाजिक इत्यादी क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याची दखल घेत समाजरत्न पुरस्कारासाठी डॉ.धनंजय भिसे यांच्या नावाची निवड करण्यात आली आहे. डॉ.धनंजय भिसे यांनी मातंग साहित्य परिषदेच्या माध्यामातून वंचित समाजात साहित्यीक व सांस्कृतिक चळवळ वाढवण्याचा संकल्प हाथी घेतला आहे. कोणत्याही वंचित समाजाचा भैतिक विकास जर घडवायचा असेल तर त्या समाजाला ...
प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर
पुणे, शैक्षणिक

प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

डॉ. धनाजी भिसे पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. ही संशोधनपदवी जाहिर केली. त्याबाबतच्या खुल्या परीक्षेचे आयोजन विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि बहि:स्थ परीक्षक डॉ.सतीश बडवे (औरंगाबाद) ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याला ८२ हून अधिक व्यक्तींनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. डॉ. भिसे ह्यांनी पीएचडीसाठी डॉ. बाबासाहेब शेंडगे (रयत शिक्षण संस्थेचे एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 'इ.स. २००० ते २०१० मधील दलित आत्मकथने : एक शोध' ह्या शीर्षकाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता. या खुल्या परिक्षेला माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी कुलगुरु एस. एन. पठाण, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ अविनाश सांगोलकर, प्...