Tag: Savitribai phule pune University

साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ
पुणे

साहित्य सम्राट अण्णा भाऊंच्या फकिराला जोगणी मिळाली – कवी. विनोद अष्टुळ

निगडी प्राधिकरण, (बाबू डिसोजा कुमठेकर) : साहित्य सम्राट पुणे व मातंग विकास संस्था खडकी यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीजवळ तीन दिवसाचे धरणे आंदोलन आयोजित केले होते. साहित्य सम्राटचे संस्थापक विनोद अष्टुळ यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी मातंग विकास संस्थेचे संस्थापक राजेश रासगे, समाजभूषण पुरस्कारथी शंकरभाऊ तडाखे, अखिल भारतीय बहुजन सेनेचे निलेश वाघमारे, गणेश भालेराव, लहुजी महासंघाचे प्रकाश वैराळ, लहुजी पॅन्थर संघटनेचे महेश सकट, सुनील मोरे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे उपकुलसचिव माननीय डॉ. मुंजाजी रासवे यांनी आंदोलनस्थळी शुद्धीपत्र मिळणे बाबत या विषयास अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. मराठी अभ्यासक्रमातील ग्रामीण साहित्य आणि शोध या ग्रंथातील अण्णा भाऊ साठे यांच्या “फकीरा” या काद...
विद्यापीठ आदिवासी नायकांचे चरित्र पुढे आणणार : प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे 
पुणे

विद्यापीठ आदिवासी नायकांचे चरित्र पुढे आणणार : प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी 'मुकाबला', 'क्रांतिवीर बिरसा मुंडा' या ग्रंथांचे प्रकाशन प्र. कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांच्या हस्ते झाले. यावेळी डावीकडून डॉ. शितल चौरे, डॉ. तुकाराम रोंगटे, डॉ. विजय खरे, सुधीर लंके, सोनवणे, प्रा. शिवाजी दिघे, प्रा. अनिल पवळ, डॉ. प्रभाकर देसाई. पुणे (प्रतिनिधी) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यात जे आदिवासी नायक स्वातंत्र्यासाठी लढले त्यांची माहिती विद्यापीठ संकलित करत असून, ती ग्रंथरुपाने समाजासमोर आणली जाणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले. विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात अकोले येथील अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील निवृत्त क्रीडा संचालक प्रा. शिवाजीराव दिघे यांनी लिहिलेले 'मुकाबला' हे आत्मकथन व विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ...
मातंग समाजाचे दिवंगत नेते ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या मुलाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर
शैक्षणिक

मातंग समाजाचे दिवंगत नेते ज्ञानेश्वर देवकुळे यांच्या मुलाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

पिंपरी : निगडी-यमुनानगरमधील मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयातील संशोधन केंद्रातील संशोधक हेमंत अरुण देवकुळे यांना पुण्याच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच पीएच. डी. प्रदान केली. त्यांनी औषधनिर्माण शास्त्रातील 'सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी' या क्षेत्रात 'एड्स या रोगांवर नैसर्गिक पॉलिमर वापरून अत्याधुनिक संशोधनचा वापर हा प्रबंध सादर केला. भोसरीतील येथील एजीओ या कंपनीमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेतली असून, त्या संशोधनाचा अतिशय चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे. या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. स्मिता पिंपळे यांनी मार्गदर्शन केले. या संशोधनासाठी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. प्रवीण चौधरी यांनी आधुनिक पद्धतीचे साहित्य उपलब्ध करून एक आधुनिक उपक्रम महाविद्यालयांमध्ये राबविला. हेमंत देवकुळेच्या या यशाबद्दल मातंग साहित्य परिषद...
प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर
पुणे, शैक्षणिक

प्रा. धनाजी उर्फ धनंजय सोमनाथ भिसे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. जाहीर

डॉ. धनाजी भिसे पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. ही संशोधनपदवी जाहिर केली. त्याबाबतच्या खुल्या परीक्षेचे आयोजन विद्यापीठाच्या मराठी विभागामध्ये मराठी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर देसाई ह्यांच्या अध्यक्षतेखाली आणि बहि:स्थ परीक्षक डॉ.सतीश बडवे (औरंगाबाद) ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्याला ८२ हून अधिक व्यक्तींनी ऑनलाईन उपस्थिती लावली होती. डॉ. भिसे ह्यांनी पीएचडीसाठी डॉ. बाबासाहेब शेंडगे (रयत शिक्षण संस्थेचे एस. एस. जी. एम. कॉलेज, कोपरगाव) ह्यांच्या मार्गदर्शनाखाली 'इ.स. २००० ते २०१० मधील दलित आत्मकथने : एक शोध' ह्या शीर्षकाचा प्रबंध विद्यापीठाला सादर केलेला होता. या खुल्या परिक्षेला माजी कुलगुरु डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी कुलगुरु एस. एन. पठाण, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, प्राचार्य डॉ अविनाश सांगोलकर, प्र...
डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण
पुणे, शैक्षणिक

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रयत विध्यार्थी परिषद आणि वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वड, जांभूळ, सिताफळ तसेच चिंच अशा विविध जातीच्या देशी फळझाडांचे वृक्षारोपण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना लावलेल्या वृक्षांचे जतन करण्याचे आश्वासन प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांनी दिले. तसेच आज आपण जलसंधारण, मृदासंधारण, वृक्ष संवर्धन केले तरच भावी पिढीसाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व सुंदर पर्यावरण मिळू शकेल. असे मत व्यक्त केले. यावेळी वसुंधरा अभियान परिवाराच्या वतीने सांगण्यात आले की, सन 2006 पासून राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण प्रेमी यांच्या सहकार्याने हळूहळू संपूर्ण टेकडी हिरवीगार बनविण्याचे स्वप्न ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन
पुणे, शैक्षणिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथे केंद्र व राज्य शासन यांनी सांगितल्याप्रमाणे दिनांक २७ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत "दक्षता जागृती सप्ताहाचे" आयोजन करण्यात आले होते. 'सतर्क भारत - समृद्ध भारत' ही संकल्पना घेऊन या सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कालावधीत शासनाने निर्देशित केल्यानुसार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर माननीय राज्यपाल व माननीय मुख्यमंत्री यांनी या सप्ताहानिमित्त दिलेला संदेश उपस्थितांना वाचून दाखवण्यात आला. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्ताने महाविद्यालयात कार्यालयाच्या दर्शनी भागात मोजक्या ठिकाणी भित्तीपत्रक व कापडी फलक लावण्यात आले. तसेच दक्षता जनजागृतीनिमित्त ऑनलाईन प्रश्नमंजुषा परीक्षा घेण्यात आली.&nbs...
प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान
पिंपरी चिंचवड, शैक्षणिक

प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान

प्रा. डॉ. किरण मोहिते पिंपरी : महात्मा फुले महाविद्यालयातील वाणिज्य शाखेतील प्राध्यापक किरण बापू मोहिते यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने नुकतीच पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे. 'नाबार्ड अधिकोषाचे आदिवासी शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक विकासातील योगदानाचे चिकित्सक अध्ययन' या विषयावर प्रा. मोहिते यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी येथील संशोधन केंद्रात आपला अभ्यास पुर्ण केला. अण्णासाहेब वाघेरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओतूर येथील डॉ. तानाजी साळवे यांनी त्यांचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. प्रा. किरण मोहिते यांना पीएचडी प्रदान झाल्याबद्दल महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर...