डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण

पुणे : रयत शिक्षण संस्थेचे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, रयत विध्यार्थी परिषद आणि वसुंधरा अभियान, बाणेर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वड, जांभूळ, सिताफळ तसेच चिंच अशा विविध जातीच्या देशी फळझाडांचे वृक्षारोपण केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना लावलेल्या वृक्षांचे जतन करण्याचे आश्वासन प्राचार्य डॉ.अरुण आंधळे साहेब यांनी दिले. तसेच आज आपण जलसंधारण, मृदासंधारण, वृक्ष संवर्धन केले तरच भावी पिढीसाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व सुंदर पर्यावरण मिळू शकेल. असे मत व्यक्त केले. यावेळी वसुंधरा अभियान परिवाराच्या वतीने सांगण्यात आले की, सन 2006 पासून राष्ट्रीय सेवा योजना व पर्यावरण प्रेमी यांच्या सहकार्याने हळूहळू संपूर्ण टेकडी हिरवीगार बनविण्याचे स्वप्न बघण्यात आले होते. ते पूर्ण होत आहे. या अभियानात सहभागी झालेले कार्यकर्ते हे असेच हे अभियान पुढे घेऊन जात खारीचा वाटा उचलत आहेत.

वृक्षारोपनाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसुंधरा अभियान, बाणेर यांचे मा.श्री.नाना मुरकुटे, मा.श्री.भुजबळ सर, मा.श्री.कांबळे सर यांचे सहकार्य लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक ऋषिकेश कानवटे, राजू काळे, सूर्यकांत सरोदे, विशाल नागटिळक यांचे सहकार्य मिळाले. यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा.डॉ.संजय नगरकर, क्रीडा विभागप्रमुख प्रा.भीमराव पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सुशीलकुमार गुजर, वाणिज्य विभागप्रमुख प्रा.डॉ.सुहास निंबाळकर, डॉ.अतुल चौरे व पोपट कराडे उपस्थित होते.

डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने बाणेर येथील तुकाई टेकडीवर केले वृक्षारोपण